जिल्ह्याच्या देवळी तालुक्यातील गुंजखेडा या वाळूघाटावर जिल्हा खनिकर्म अधिकारी अतुल दौड यांनी दुचाकीने जात वाळूघाटावर धाड टाकली.
खनिकर्म अधिकारी अचानक पोहचल्याने तराफ्याच्या सहाय्याने वाळू काढत असलेल्या मजुरांनी तेथून पळ काढला. कारवाईत वाळू काढण्यासाठी बनविण्यात आलेले तराफे जप्त करण्यात आले आहे.
गुंजखेडा वाळूघाटावर (Valu Mafia) मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी होत असल्याची चर्चा सगळीकडे एकावयास मिळत होती. वाळू काढण्यासाठी ड्रमच्या सहाय्याने तराफे तयार करून मजुराच्या सहाय्याने येथून वाळू उपसा सुरु होता. मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी करत टॅक्टरच्या सहाय्याने विकल्या जातं होती. अनेकदा कारवाई करूनही वाळूमाफियांचा हा गोरखधंदा सुरूच असल्याने जिल्हा खनिकर्म अधिकारी अतुल दौड यांनी थेट दुचाकीने येत या ठिकाणी कारवाई केली.
चार तराफे केले जप्त
खनिकर्म अधिकारी पोहचताच चार तराफ्याद्वारे आठ मजूराच्या साहाय्याने पाण्याखालील वाळू काढत होते. खनिकर्म अधिकाऱ्यांचा पथक दिसताच मजुरांनी तेथून पळ काढला. या कारवाईत घाटावरील काही साहित्य जाळून नष्ट करण्यात आले. तर इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई खनिकर्म अधिकारी अतुल दौड यांनी केली असून त्यांच्या सोबत त्यांच्या कार्यालयातील तुषार शिंदे या कर्मचाऱ्याचा सहभाग होता.