अकोला अमरावती वाशिम जिल्हा यांच्यासह संपूर्ण राज्यातील अनुसूचित जमातीतील आदिवासी नागरिक यांच्यासह आदिवासी कोळी महासंघाचे अध्यक्ष आणि भारिप बहुजन महासंघाचे तत्कालीन राज्यस्तरीय ज्येष्ठ नेते आणि माजी कॅबिनेट राज्यमंत्री डॉ दशरथ भांडे यांनी बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांची भेट घेऊन यांच्याशी नुकतिच सकारात्मक चर्चा करून लवकरच आपण बहुजन जनता दलामध्ये येण्याचा निर्धार व्यक्त केला असे बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी दिलेल्या प्रसिद्धि पत्रकाद्वारे म्हटले आहे
राज्यातील अनुसूचित जमातीतील नागरिकांच्या प्राथमिक गरजा आहे राज्यातील सरकार सोडू शकत नाही उलट या घटकांना आपल्या घटनादत्त अधिकारापासून वंचित ठेवण्याचा कुटिर डाव राज्य सरकार आपल्या सोबत खेळत असल्याचे ही बाब लक्षात येताच आपण येत्या काळात अनुसूचित जमातीतील आदिवासी नागरिकांना सामाजिक शैक्षणिक आर्थिक विकासासाठी न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील वाढता प्रभाव आणि संघटित महामानवांचे वंशज असलेले डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू संदेश आंबेडकर, शिक्षण क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांचे नातू शांताराम फुले साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सुनबाई श्रीमती सावित्रीबाई साठे, वीर पुरुष, फकिरा रानोजी साठे हे मान्यवर वंशज बहुजन जनता दलामध्ये सक्रिय असून माजी कॅबिनेट राज्यमंत्री डॉ दशरथ भांडे यांनी बहुजन जनता दलामध्ये जाण्याचा निर्धार व्यक्त केला असेही पंडित भाऊ दाभाडे यांनी वरील दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे