कारंजा : येथून जवळच असलेल्या बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालय यावर्डी येथील मुख्याध्यापक तथा विज्ञान शिक्षक विजय देविदास भड यांची निवड क्षेत्रिय शिक्षा संस्थान,भोपाल येथे आयोजित माध्यमिक विज्ञान शिक्षकांच्या उद्बबोधन कार्यशाळेकरीता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, येथिल उपसंचालक विकास गरड यांनी एका पत्राद्वारे केली आहे.
सदर कार्यशाळेकरीता महाराष्ट्रातील माध्यमिक शाळेत विज्ञान शिकवणाऱ्या पंधरा विज्ञान शिक्षकाची निवड करण्यात आली आहे. अमरावती विभागातून निवड यादि मध्ये विजय भड याचं एकच नाव असल्यामुळे, ते अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
सदर प्रशिक्षण दिनांक 19 ते 23 सप्टेंबर 2022 या कालावधीत क्षेत्रीय शिक्षा संस्थान,भोपाल येथे महाराष्ट्र, मध्य प्रदेश व छत्तीसगड या तीन राज्यातील प्रत्येकी 15 विज्ञान शिक्षकांकरिता आयोजित केलेले आहे.
प्रशिक्षणामध्ये विज्ञान कीटच्या वापराबाबत प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
अमरावती विभागातून विजय भड या एकाच विज्ञान शिक्षकाची निवड
सदर प्रशिक्षणासाठी झाल्याबद्दल वाशिम जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी रमेश तांगडे व प्राथमिक शिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव,शिक्षण निरीक्षक आकाश आहळे, संस्थेचे अध्यक्ष केशवराव खोपे व जिल्ह्यातील बहुतांश विज्ञान शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच कारंजा येथील साप्ताहिक करंजमहात्म्य परिवाराचे प्रमुख तथा महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदचे वाशिम जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी त्यांना शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे .