वाशिम : गेल्या आठ दिवसांपासून आम्ही यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघाचा सखोल आढावा घेतला असून,प्राप्त झालेल्या मतदारांच्या प्रतिक्रियेमधून महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेद्वार संजय देशमुख यांचा विजय निश्चित असल्याचे मत,महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष तथा दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी कारंजा शहराचे माजी नगराध्यक्ष अरविंदजी लाठीया यांचेशी बुधवारी प्रचार सांगता होत असतांना प्रगट केले आहे.या संदर्भात माहिती देतांना त्यांनी सांगीतले की, "आम्ही मतदार संघाचा दौरा केला असता प्रत्येक ठिकाणच्या प्रतिक्रिया जेव्हा जाणून घेतल्या तेव्हा एकेकाळी पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापूस पिकाच्या उत्पादक असलेल्या या मतदार संघातील शेतकऱ्याच्या समस्यांकडे व शेतकरी आत्महत्याकडे शासनाचे दुर्लक्ष्य असणे,येथील सुशिक्षीत बेरोजगाराच्या समस्याकडे शासनाचे लक्ष्य नसणे.कोणताही मोठा उद्योग कारखाना नसणे.तसेच मतदार संघातील वाशिम जिल्हा आंकाक्षीत असणे. व मतदार संघात स्थानिकांना डावलून महायुतीने बाहेरच्या उमेद्वाराला उमेद्वारी देणे.यामुळे प्रत्येक मतदाराचा दृष्टीकोन महायुतीच्या राजकारणाला कंटाळून महाविकास आघाडीकडे वळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.तसेच महत्वाचे म्हणजे यावेळी लक्षात घेण्यासारखे म्हणजे महाविकास आघाडी मधील सर्वच घटक पक्षाचे नेते तन मन धनाने , अगदी जीवाचे रान करून,संजय देशमुख यांचे प्रचारकार्य इमाने इतबारे करीत असल्याचे आढळून येत आहे.यावेळी अल्पसंख्याक,आदिवासी, भटक्या विमुक्त,इतर मागासवर्गीय समाजासोबतच, निर्णायक मतदान असणाऱ्या मराठा,कुणबी,पाटील लॉबीचा कौलही महाविकास आघाडी कडेच दिसून येत आहे.या मतदार संघातील लढतही अखेरच्या क्षणापर्यंत तुल्यबळ होण्याची दाट शक्यता असून विजय मात्र महाविकास आघाडीचा होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे."