कारंजा(लाड) : महाराष्ट्र राज्यात गेल्या सहा महिन्यांपासून सुरु असलेल्या संघटनपर्वात महाराष्ट्रामध्ये पक्षाचे सुमारे दीड कोटी नवीन प्राथमिक सदस्य नोंदवीत भारतीय जनता पक्षाने जगातील सर्वात जास्त सदस्य असलेला पक्ष बनविण्याचा मान पटकविला.कारंजा मानोरा मतदार संघात तब्बल ४५ हजार प्राथमिक सदस्य नोंदणी पदाधिकारी व भाजपा पदाधिकाऱ्यांनी केली. त्यानंतरच्या टप्यात सक्रीय सदस्य नोंदणी , बुथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुख बनवुन बुथ गठीत करण्याची प्रक्रीया राबविण्यात येऊन तदनंतर वाशिम जिल्ह्यांतर्गत कारंजा तालुक्यात तालुका अध्यक्ष तसेच शहर अध्यक्ष यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. मतदार संघाच्या विद्यमान लोकप्रिय आमदार श्रीमती सइताई डहाके यांच्या अध्यक्षतेखाली कारंजा तालुकाध्यक्षपदी अमोल ठाकरे व संजय लाहे यांची तर शहर अध्यक्ष पदी सौ . प्राजक्ता माहीतकर यांची निवड सर्वानुमते दि . 20 एप्रिल रोजी भाजपा कार्यकर्त्याच्या उपस्थितीत करण्यात आली. या प्रसंगी प्रामुख्याने कारंजा मानोराच्या आमदार श्रीमती सइताई डहाके
, पक्षा तर्फे पाठविण्यात आलेले पक्ष निरीक्षक गोपाल पाटील राउत , राहुल तुपसांडे शिवशंकर भोयर माजी तालुका अध्यक्ष राजीव काळे ,निरंजन करडे, युवा नेते कौस्तुभ डहाके ,गजानन खोडे यांचे सह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा नियुक्ती पत्रासह पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ ठरवून भाजपा पक्ष मतदारसंघामध्ये तळागाळात पोहचवुन सामान्य नागरीकांना न्याय देण्याकरीता कटीबद्ध राहणार असल्याचे मत व्यक्त केले.भाजपच्या कार्यकर्त्यानी पण नविन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे.असे वृत्त विजय खंडार यांनी कळविले...