कारंजा : हुकूमशाही सत्तेला बाहेर हाकलण्यासाठी ,शेतकरी शेतमजूर व कामगार वर्गाला न्याय देण्यासाठी , बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्याकरीता व लोकशाही तसेच संविधान वाचविण्यासाठी "है तयार हम "चा नारा देत दि.28 डिसेंबर रोजी नागपुरला संपन्न झालेल्या काँग्रेसच्या महारॅलीत कारंजा लाड व ग्रामीण भागातील हजारो काँग्रेस कार्यकर्त, पदाधिकारी व जनता मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे सचिव दिलीप भोजराज यांच्या नेतृत्वात सहभागी झाले होते.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे अध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वात हि रॅली काँग्रेसच्या 138 व्या स्थापना दिनी म्हणजेच दि. 28 डिसेंबर रोजी देशाचे मध्यवर्ती व महत्त्वाचे ठिकाण असलेल्या नागपूर शहरात आयोजित करण्यात आली होती.
काँग्रेसच्या स्थापनेपासून तर आजपर्यंत प्रत्येक चढउतारा विदर्भ नेहमीच काँग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभा राहीला आहे. इंदिराजी व राजीवजींना याच विदर्भातुन प्रचंड प्रमाणात समर्थन मिळाले होते. मोदी लाटेतही काँग्रेस ने विदर्भात चांगली कामगिरी केली आहे त्यामुळे येणाऱ्या काळातही होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर नागपूरात झालेली काँग्रेस ची महारॅली महाराष्ट्राच्या व कार्यकर्त्याच्या दृष्टिने एकप्रकारे संजीवनीच ठरणार आहे.
या रॅलीत खा. राहुलजी गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्यासह राज्यातील व परराज्यातील काँग्रेस चे अनेक दिग्गज नेतेमंडळीनी उपस्थिती दर्शवून विराट महारॅलीला मार्गदर्शन केले.
या महारॅली सहभागी होण्यासाठी कारंजा लाड शहर व तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त व पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस देवानंदभाऊ पवार, पक्ष निरीक्षक डाॅ. मोहम्मद नदीम सर व जिल्हाध्यक्ष आमदार अमित भाऊ झनक यांच्या सूचनेनुसार तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे सचिव दिलीप भोजराज यांच्या नेतृत्वात मोठी तयारी केली होती
कारंजा लाड शहर व तालुक्यात प्रदेश सचिव व काँग्रेस चे कट्टर व निष्ठावंत नेते दिलीप भोजराज यांच्या नेतृत्वात अँड.संदेश जैन जिंतुरकर ,ॲड वैभव ढगे, विठ्ठलराव अवताडे,अमीर खान पठाण, राज चौधरी, ॲड.वैभव लाहोटी, सचिन पाटील, ललिताताई थोटांगे, युसुफ भाई जट्टावाले,अनिस भाई, प्रदिप भाऊ वानखडे, उमेश शितोळे, अक्षय बनसोड ,प्रफुल्ल गवई, विरेन देशमुख , सुरेश पाटील लांडकर , फैजल खांन पठाण, विशाल लाडोने, अशोकभाऊ कडु, आशिष सावके, साहिल पवार, अभिजित शिंदे, शोराब खांन पठाण , हसन जट्टावाले, अल्ताफ पप्पुवाले , नुर मोहम्मद, सोनु मिर्झा, शाहरुख बिल्डर, अन्नु ताज, शाबीरभाई गारवे, कलीम जट्टावाले, अल्ताफ ख्याजावाले, शाहरुख नौरंगाबादी, अमोल जामनिक, राहुल गुळदे, सोहेल खान, सागर जामनिक, अशोक चक्रे, योगेंद्र जामनिक आदी कार्यकर्त व पदाधिकारी रॅलीत सहभागी झाले होते .
काँग्रेस कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांमध्ये या रॅली मुळे उत्साह संचारला होता
आपल्या प्रतिक्रिया द्या....