कारंजा : येत्या शनिवार दि . ०३ डिसेंबर रोजी , स्थानिक महात्मा गांधी चौक स्थित, विजय हॉटेल शेजारी, चुना पुरा गल्लीमध्ये, हजरत लाल शाह बाबा दरगाह समोर, उमेशभाऊ अनासाने यांचे बालाजी ज्वेलर्स येथे, साप्ताहिक करंजमहात्म्य तथा महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेच्या कार्यालयाच्या उद्घाटनाचा आणि साप्ताहिक करंज महात्म्यच्या "वारकरी - विशेषांकाच्या" प्रकाशनाचा दिमाखदार सोहळा थाटात संपन्न होणार असून,

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, जिल्हा परिषद समाज कल्याणचे माजी सभापती जयकिसनभाऊ राठोड तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार राजेंद्रजी पाटणी, आमदार ऍड किरणराव सरनाईक तथा आमदार अमितजी झनक, मुख्यसंपादक - कारंजा नगरीतील एकमेव व्यसनमुक्तीसेवा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार, साहित्यीक, लोककलावंत संजय कडोळे हे असणार आहेत. त्यानिमित्ताने आज गांधी चौक कारंजा येथे बैठक घेण्यात आली. यावेळी बैठकीला, बिसमिल्लाखॉ मन्वरखॉ ,काजी मोहम्मद रफी ऊल्ला, शेख हमजा कालिम खॉ, अनिस अहमद, कौसर अली, अब्दुल गाझी, मोहम्मद मुश्ताक , जाहिर भाई इ., सदानंद वानखडे, महेश जवाहरमलाणी, उमेश अनासाने, विजय खंडार इत्यादी उपस्थित होते.

तरी कृपया सर्वांनी, शनिवार दि.०३/११/२०२२ रोजी उपस्थित रहावे अशी विनंती कार्यक्रमाचे आयोजक, कार्यालय प्रमुख तथा साप्ता . करंजमहात्म्यचे सहसंपादक उमेश अनासाने यांनी केली आहे. सदरहु कार्यालयात जनतेच्या समस्याच्या लेखी तक्रारी व लेखी बातम्या, कार्यालय प्रमुख उमेश अनासाने (सहसंपादक) यांचेकडे आणून दिल्यास, त्याची अविलंब दखल घेतल्या जाईल.असे आवाहन सुद्धा करण्यात आलेले असल्याचे, सचिव विजय पाटील खंडार यांनी कळवीले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....