कारंजा : तळागाळातील गोरगरीब विधवा, परित्यक्त्या, दिव्यांग, निराधार दिपावली या सणाला जगावेगळे महत्व देत असतात. सणाच्या निमित्ताने आपल्या लहानग्या मुलांना नविन कपडे लत्ते मिळावे. दररोज चटणी भाकरी किंवा वरणभात खाणार्या आपल्या मुलाबाळांना दिपावली निमित्ताने गोडाधोडाचे मिष्टान्न पुरणपोळी खायला मिळावी अशी त्यांची आशा आकांक्षा असते. त्यामुळे गोरगरीब निराधार सुद्धा जोपर्यंत त्यांचे शरिराने होते तोपर्यंत एखादा कामधंदा करून मोलमजूरी करीत असतात. परंतु यावर्षी अतिवृष्टीमुळे व कामाच्या मंदीमुळे सगळीकडे बेरोजगारीचे वातावरण आहे . अशात कमितकमी सामाजिक न्याय विभागाच्या अर्थसहाय्य योजनेतून तरी मदत मिळावी अशी त्यांना अपेक्षा होती. त्याकरीता महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते संजय कडोळे यांनी कारंजा तहसिल कार्यालयाचे कर्तव्यदक्ष तहसिलदार धिरज मांजरे यांचेकडे, "निराधारांना दिपावली पूर्वी अर्थसहाय्य देण्याची मागणी लावून धरली होती.
आणि विशेष बाब म्हणजे तहसिलदार धिरज मांजरे व त्यांच्या अधिकारी कर्मचार्यानी सुद्धा काळजीपूर्वक दिपावलीच्या सहा दिवस पूर्वीच निराधारांच्या खात्यात अर्थसहाय्य पाठवीले. त्यामुळे कारंजा तालुक्यातील निराधारांच्या चेहर्यावर आनंद दिसत असून त्यांची दिवाळी गोड केल्यामुळे, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे, विजय पाटील खंडार, उमेश अनासाने, दामोधर जोंधळेकर, विनोदकुमार गणवीर, पद्माकर पाटील कडू, रोहीत महाजन इत्यादीनी तहसिल कार्यालयात जावून तहसिलदार धिरज मांजरे, निवासी ना तहसिलदार विलास जाधव, नायब तहसिलदार विनोद हरणे, नायब तहसिलदार राजेश ढोमडे, संजय गांधी योजना विभागाच्या संजीवनी वानखडे मॅडम, श्रीकांत मेहेंगे, राजु कवळे, पटवारी अमोल वक्ते, महेश धानोरकर इत्यांदीचा पत्रकार परिषदेतर्फे पुष्पगुच्छ देवून सत्कार केला आणि आभार मानले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना तहसिलदार मांजरे म्हणाले, शासनाचे अनुदान प्राप्त झाल्यामुळे आम्ही कोणतीही दिरंगाई न करता गोरगरीबांची दिवाळी गोड करण्याकरीता वेळेवर अर्थसहाय्य देवू शकलो याचे श्रेय माझ्या कर्मचाऱ्यांना दिले पाहीजे." तसेच यावेळी त्यांनी सर्व निराधार आणि गोरगरीबांना व कारंजेकरांना दिपावलीच्या आपल्या मनोगतामधून शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत. त्याच प्रमाणे स्टेट बॅक ऑफ इंडिया शाखा कारंजाचे व्यवस्थापक योगेश अघडते यांनी स्टेट बँकेमधून निराधारांना तातडीने अर्थसहाय्य वितरण सुरु केल्याबद्दल त्यांचे सुद्धा यावेळी बँकेत जाऊन पत्रकारांनी सत्कार केला .असे वृत्त महाराष्ट्र 24 चे पत्रकार विनोदकुमार गणवीर यांनी दिले आहे.