अकोला:- दि.८सप्टेंबर २०२५ स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या माध्यमाने डॉ.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात दिव्यांग बांधवांना पांढरी काठी, व्हीलचेअर, शिष्यवृत्ती व शैक्षणिक साहित्याचे मोफत वितरण संपूर्ण भारतभर केले जात आहे . या सामाजिक कार्याची दखल विविध सामाजिक संस्था व अकोलेकर घेत आहेत. माजी प्राचार्य अरुण कुमार गट्टानी यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला ची माहिती फेसबुक, इंस्टाग्राम,युट्युब व गुगल वरून मिळवली. संस्थापक अध्यक्ष डॉ.विशाल कोरडे यांना आपल्या वाढदिवसाच्या दिवशी ७ सप्टेंबर २०२५ रोजी घरी आमंत्रित केले . डॉ. विशाल कोरडे व सदस्य अस्मिता मिश्रा यांनी संस्थेच्या विविध उपक्रमाची माहिती गट्टानी परिवाराला दिली. विशेष म्हणजे अंध बांधवांसाठी प्रत्येक वर्षी पांढऱ्या काठ्यांची आवश्यकता असते या पांढऱ्या काठ्या मुंबई किंवा देहरादून येथून खरेदी करून दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे अंध बांधवांना मोफत वितरित केल्या जातात . प्राचार्य अरुण कुमार गट्टाणी यांनी आपल्या वाढदिवसा निमित्त अंध बांधवांसाठी उपयुक्त असणाऱ्या पांढऱ्या काठ्याचे दान दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या दिव्यांग सेवा या उपक्रमाला दिले.दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाच्या माध्यमाने दिव्यांगांना रोजगार, शिक्षण व आरोग्यासाठी भरीव सहकार्य केले जात आहे.आम्ही या संस्थच्या उपक्रमात सहभागी होऊ , तसेच समाजातील विविध घटकांनी संस्थेला सहकार्य करावे अशी प्रतिक्रिया मीना गट्टानी यांनी व्यक्त केली.या आगळ्यावेगळ्या वाढदिवसाला संस्थेचे सदस्य उपस्थित होते. ज्यांना संस्थेचे सदस्य होऊन दिव्यांगांना मदत करायची आहे त्यांनी संस्थेच्या ९४२३६५००९० या हेल्पलाईन क्रमांकावर नोंदनी करावी असे आव्हान अनामिका देशपांडे यांनी केले आहे. या आगळ्यावेगळ्या वाढदिवसाचे कौतुक अकोलेकर करीत आहेत .