कारंजा : वर्धा मतदार संघाचे माझी खासदार रामदासजी तडस यांना राम मंदिरात प्रवेश नाकारून असंविधानिक भाषेचा वापर केल्याबद्दल मंदिराचे ट्रस्टी याच्यावर कारवाई करण्याचे निवेदन दि.२२/४/२०२५ मंगळवार रोजी कारंजा येथील समस्त तेली समाज बांधवांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार कुणाल झाल्टे यांना दिले.

सविस्तर माहिती असे की देवळी,जिल्हा वर्धा येथील माजी खासदार रामदासजी तडस हे सकाळी १०:३० वाजता येथील राम मंदिरात पूजा करण्यासाठी गेले त्यावेळी मात्र मंदिराचे ट्रस्ट मुकुंद चौरीकर यांनी तुम्ही जानवे व सोवळे घातले नाही. त्यामुळे तुम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात येऊन दर्शन घेऊ शकत नाही.असे बोलून त्यांना मनाई करून त्यांना अपमान जनक वागणूक दिली.याच्या निषेधार्थ व संबंधित मंदिराच्या ट्रस्टीवर कारवाई करण्यासाठी कारंजा तहसीलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना कळविण्यासाठी कारंजा येथील समस्त तेली समाज बांधवांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन दिले.यावेळी महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेचे जिल्हाध्यक्ष शिवदासजी सुर्वे, समस्त तेली समाज बहुउद्देशीय संघटनेचे अध्यक्ष किरण क्षार,सचिव-सुनील दहापुते,उपाध्यक्ष-अतुल गुल्हाने,अतुल ढोरे,सुनील भाऊ गुल्हाने,गजानन भाऊ जाधव,प्रशांत बिजवे, बाबुराव सरोदे,विनय गुल्हाने,संदीप गुल्हाने,गजानन झंझाट,सुधीर आमले, गजानन गुल्हाने,नितीन गढवाले,किशोर पाठे,लक्ष्मण सिंहे,मेहसरे भाऊ,गजानन वाघ,सुधीर आमले,वैभव जीरापुरे,कृष्णा तुपाडे,संदीप ढोरे,दीपक गोदे,प्रवीण ढोरे,अनिल सुडके,गणेश गुल्हाने,बाळूभाऊ मेहसरे, अशाप्रकारे बहुसंख्य तेली समाज बांधव उपस्थित होता.
आपल्या प्रतिक्रिया द्या....