दि. 04-08-2025 रोजी जोगीसाखरा रामपूर फाट्यावर झालेल्या मोटार अपघातातील जखमी भास्कर मळू सरपे रामपूर यांचा उपचारादरम्यान सात ते आठ दिवसानंतर दि10 ऑगस्ट ला .दुर्दैवी मृत्यू झाला
घटनेच्या दिवशी मयत भास्कर सरपे हे आरमोरीला जात असतांना आरमोरी वरून येणारा अमोल राजू मानकर हा दुचाकी नंबर MH-33 AB 1986 गाडीने मद्यधुंद व बेजबाबदारपणे गाडी चालवीत होता. जेव्हा अमोल मानकर हा जोगीसाखरा येथील असून याने अपघात केला त्यावेळेस त्याच्याजवळील गुलाबी रंगाच्या कापडी थैलीत दारू होती असे अपघात ठिकाणी काही नागरिकांनी बघितली अशी चर्चा आहे. यावरून अमोल मानकर हा अवैध दारूचा धंदा करतो कि, कुणाचा दारू वाहक आहे, आणि दारू वाहक असेल तर कुणाकडून आणली होती हे स्पष्ट झालेले नाही.
अमोल मानकर यावर कलम 281,125 ब,मोटार वाहन अधिनियम 1988 नुसार 184 अन्वये गुन्हा नोंदवीला आहे.
भास्कर मळू सरपे रामपूर यांना उपचारासाठी नागपूर येथे नेण्यात आला तेव्हा पाच ते सहा दिवस उपचार घेऊनही मृत्यूने गाठले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.