अकोला: स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाच्या माध्यमाने डॉ.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात विविध सामाजिक उपक्रम संपूर्ण भारतभर राबविले जात आहेत.*रक्षाबंधना निमित्त दिव्यांगांनी तयार केलेल्या राख्यांना महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून मागणी येत आहे*.*प्रभात किड्स स्कूल, अकोला चे संचालक डॉ.गजानन नारे व संचालिका सौ.वंदना नारे यांनी सदर राखी उपक्रमाला दि. २६ जुलै २०२५ रोजी आमंत्रित केले होते*. *शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी दिव्यांगांनी तयार केलेल्या राख्या, तुपाची फुलवात,धूप , उदबत्ती पर्यावरणपूरक पेन- पेन्सिल व क्रोशाच्या वस्तूंची खरेदी करून दिव्यांगांच्या शिक्षण रोजगार व आरोग्यासाठी आपले भरीव योगदान दिले*. सदर उपक्रमाला प्रभात किड्स स्कूलचे सचिव नीरज आवंडेकर, प्राचार्य सौ. वृषाली वाघमारे, उपप्राचार्य सौ. अर्चना बेलसरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख नंदकिशोर डंबाळे यांची उपस्थिती होती.*समाज कल्याण विभागाचा आदर्श संस्था पुरस्कार प्राप्त दिव्यांग सोशल फाउंडेशन संस्थेच्या वतीने दिव्यांगांना रोजगार देण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.*आमची संस्था या सर्व उपक्रमांना निरंतर प्रोत्साहन देत राहिल.अकोल्यातील विविध शाळा, महाविद्यालय व सामाजिक संस्थांनी या उपक्रमात सहभाग नोंदवावा असे प्रतिपादन डॉ.गजानन नारे यांनी केले*.*या सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदविण्यासाठी संस्थेच्या ९४२३६५००९० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन डॉ.विशाल कोरडे यांनी केले.* यावेळी दिव्यांग सोशल फाउंडेशन तर्फे प्रभात किड्स शाळेचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.या सामाजिक उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अनामिका देशपांडे, अस्मिता मिश्रा, तन्वी दळवे, विजय कोरडे, आरती जंगले, रुपाली सावजी,अदिती वाडे व नेहा पलन यांनी सहकार्य केले.