कारंजा : स्थानिक विदर्भ लोककलावंत संघटना, जय भवानी जय मल्हार गोंधळी नवरात्रोत्सव मंडळ आणि मराठा सेवा संघ प्रणित, संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद कारंजा द्वारा आयोजीत, शनिवार दि .3 डिसेंबर, रोजी सकाळी १०:३० ला,श्री एकविरा माता मंदिर मळीपूरा कारंजा येथे संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेच्या होऊ घातलेल्या मेळाव्या निमित्ताने, मराठी चित्रनगरी ( फिल्मसिटी ) मुंबईचे अभिनेते आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईचे अध्यक्ष नरेशजी गडेकर तथा मराठी रंगभूमीच्या नामांकित अभिनेत्री - सिने तारिका आसावरी तिडके यांचे दि . ३ डिसेंबर रोजी आगमन झालेले असून, स्थानिक कार्यक्रमाचे आयोजक संजय कडोळे, नंदकिशोर कव्हळकर सौ आशाताई कव्हेकर, पत्रकार उमेश अनासाने , सौ छायाताई गावंडे, डॉ. गजानन गावंडे यांच्या कडून त्यांचे कलानगरी कारंजा येथे हर्षोल्सात भव्य स्वागत करण्यात आलेले आहे. याबाबत अधिक वृत्त असे की, तिर्थक्षेत्र कारंजा नगरीत आज शनिवार रोजी पहिल्यांदाच भव्य असा जिल्हास्तरीय वारकरी मेळावा होऊ घातलेला असून मेळाव्याचे उदघाटन आमदार राजेंद्र पाटणी, प्रमुख अतिथी आमदार ऍड किरणराव सरनाईक,अमित झनक, आमदार लखन मालिक , जि प अध्यक्ष चंद्रकांत दादा ठाकरे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष नारायणराव काळबांडे, संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद जिल्हाध्यक्ष हभप श्रीकृष्ण महाराज पाटील, तालुकाध्यक्ष राजेंद्र मोडक, भुजंगराव वाळके, माजी नगराध्यक्षा उर्मिला ताई इंगोले, माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके, अ भा नाट्य परिषद राज्य कार्यकारिणीचे उज्वल देशमुख, असणार आहेत . शिवाय कार्यक्रमाला दिग्गज अशा लोककलावंत आणि चित्रपट कलावंताची उपस्थिती असणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने, राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज, सप्तखंजेरी प्रबोधनकार पंकजपाल महाराज, रंगभूमि चित्रपट अभिनेते नरेश गडेकर, मराठी चित्रपट रंगभूमि अभिनेत्री तथा "संत गजानन शेगावीचे" मालिकेच्या नायिका आसावरी तिडके उपस्थित राहणार असून कलावंत मंडळीचे आज शुक्रवारच्या उत्तररात्री आगमन झाले आहे . तरी सर्व कारंजेकर नागरिक, वारकरी, भाविक मंडळी,पत्रकार बंधू यांनी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांकडून, नंदकिशोर कव्हळ्कर, डॉ .इम्तियाज लुलानिया, ऍड संदेश जिंतुरकर, रोमिल लाठीया, डॉ . ज्ञानेश्वर गरड, उमेश अनासाने, सौ प्रणिता दसरे, सौ छायाताई गावंडे यांनी केले असल्याचे आयोजक संजय कडोळे यांनी प्रसिद्धी पत्रकात कळवीले आहे .
आपल्या प्रतिक्रिया द्या....