राज्याच्या गडचिरोली, भंडारा जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात कायमच पोलीस आणि माओवादी यांच्यात धुमश्चक्री सुरू असते. छत्तीसगडमधील विजापूर जिल्हा नक्षलग्रस्त क्षेत्र आहे.
येथे नक्षलवाद्यांची दहशत शिगेला पोहोचली आहे. येथे पुन्हा एकदा नक्षलवाद्यांनी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडवली आहे. मुतवंडी गावालगत चकमक सुरू असताना या चकमकीत अडकलेल्या सहा वर्षीय मुलीचा गोळी लागून मृत्यू तर आई गंभीर जखमी झाली आहे.
छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात पोलीस माओवादी यांच्यात चकमक झाली. चकमकीत दोन जवान जखमी झाले आहेत. तर मुतवंडी गावालगत चकमक सुरू असताना या चकमकीत अडकलेल्या सहा वर्षीय मुलीचा गोळी लागून मृत्यू तर आई गंभीर जखमी झाली आहे. या चकमकीत जहाल माओवादी चंद्रन्नासह काही माओवादी जखमी झाल्याचाही अंदाज आहे. चकमकीत जखमी झालेल्या महिलेला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी सर्चिंग ऑपरेशन सुरू आहे.