कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे भाजपाचे ज्येष्ठ अनुभवी आणि लोकप्रिय आमदार स्व. मा.श्री. राजेन्द्रजी पाटणी यांचे वयाच्या ५९ व्या वर्षी दिर्घ आजाराने दुःखद निधन .. करंजमहात्म्य परिवार तथा विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा कडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! शोकाकुल : संजय कडोळे व मित्र मंडळ.
*नियतीने अखेर डाव साधला ; कारंजा मानोरा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी साहेब यांचा स्वर्गवास.*
कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय स्व.श्री.राजेंद्र पाटणी साहेब यांचे आज दि 23 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी दुखद निधन झाले असून त्यांच्या निधनाने वाशिम जिल्ह्यातील कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या दुःखद निधनाबद्दल आपल्या प्रतिक्रिया कळवितांना त्यांचे निकटवर्ती तथा स्विय सहाय्यक संजय भेंडे यांनी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना कळवितांना आपल्या शोकाकुल भावना व्यक्त करतांना म्हटले की, महाराष्ट्रातील भाजपाचा कट्टर नेता आणि विकासाच्या बाबतीत वेडा असणारा माणूस या निमित्ताने आज हरपला.भाजपा पक्षाची न भरून निघणारी हानी यामुळे झाली.त्यांच्या या दुःखद घटनेची माहिती देणारा कार्यकर्ता रडतो आहे. ऐकणाराही रडतो आहे. सामान्य माणसाचा आधार हरपलाआहे.सर्वसामान्य माणसाचा हित जपणारा त्याची उन्नती साधण्यासाठी सतत धडपडणारा व्यक्ती एक महापुरुष आज आपल्यातून निघून गेला. मतदारसंघातीलच नव्हे तर जिल्ह्यातील समस्त जनतेचा मनातील ताईत असणारा अत्यंत दयावान माणूस आज देव झाला. जिल्ह्यातील कष्टकरी ,शेतकरी, कामगार ,विद्यार्थी,नोकर,सेवक या प्रत्येक घटकांसाठी आपल्या कार्यकाळात अविरत कष्ट करणारा आपल्या जिल्ह्यातील महामानव आज चिरनिद्रेत गेला. अनेक कामावर आपल्या कामाची अमिट छाप उमटविणारा महानायक सगळ्यांना पोरका करून आज आपल्यातून निघून गेला. अत्यंत प्रेमळ सर्वांशी प्रेमाने वागणारा जीवनात चारित्र्य सांभाळणारा धार्मिक संस्काराचे अधिष्ठान असलेला माणूस नव्हे तर प्रत्यक्ष देवदूत म्हणून या जिल्हाभूमीवर आपल्या कर्तुत्वाने नावलौकिक मिळविलेला आपलाच माणूस आज आपल्यातून निघून गेला. आपल्यापासून दूर झाला. दैदीप्यमान वैभव कीर्ती असतानाही सर्व सामान्य सर्वसामान्य व्यक्तींसोबत वागताना त्यांनी सर्वसामान्य बनूनच आपली भूमिका अदा केली.प्रत्येक व्यक्तीस व्यक्तीसमूहास सतत न्याय देण्याचा प्रयत्न आपल्या कामकाजातून केला.मतदार संघातील जिल्ह्यातील त्यांच्यासी संपर्कात असणारी जनता आमदार राजेंद्र पाटणी यांच्या कायमस्वरूपी जाण्याने, त्यांचा आधार गेल्याने निराधार झाली आहे.सुख दुखात लोक ज्यांना अधिकाराने हाक द्यायचे व त्या हाकेस तात्काळ हो देणारा आपला हक्काचा माणूस आज आपल्यातून निघून गेला.कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे अनेकदा प्रतिनिधित्व करणारे आपले लोकप्रिय आमदार माननीय राजेंद्र पाटनी यांचे आज देहावसान झाले असून कार्यकर्त्यांच्या डोळ्यातील न थांबणारे अश्रू त्यांच्या गालावर ओघळत आहे. निरोपा निरोपी करताना या वृत्ताची करताना शहानिशा करताना कार्यकर्त्यांचे आवाज क्षीण झालेत. आज आमदार राजेंद्र पाटणी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिवारास दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वर प्रदान करो. अशी प्रार्थना करतो. अशा शब्दात कारंजा येथील त्यांचे निकटवर्ती आणि स्विय सहाय्यक संजय भेंडे यांनी आपल्या दुःखद भावना कळवील्या आहेत.