लोहार समाज कलाकुसर घडविण्यात परंपरागतरीत्या पूर्वीपासून कुशल आहे पण बदलत्या काळानुसार आता आपले उद्योग व्यवसायात बदल घडवून स्पर्धेच्या युगातही आपली व्यवसाय कायम रहावे यासाठी आधुनिकतेची कास धरून व त्या गुणवत्तेचे शिक्षण घेऊन लोहार समाजाने नवे बदल स्वीकारावे असे आव्हान लोहार समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप हजारे यांनी केले.
वैरागड येथे लोहार समाजाच्या वतीने देवशील्फी विश्वकर्मा यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच संगीता या उद्या प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच भास्कर बोडणे आनंदराव बावणे, मोतीराम मेश्राम, संतोष चंदनखेडे, भीषण चंदनखेडे, विश्वनाथ ठेंगरे ,विजय गुरनुले, बालाजी पोपडी, मुखरु खोब्रागडे, लक्ष्मण लाडे, प्रा. प्रदीप बोडणे, नेताजी नेवारे, प्रदीप खोब्रागडे ग्रा.पं. सदस्य संगीता मेश्राम, आदेश आकरे, सत्यदास आत्राम,
दिपाली ठेंगरे, प्रतिभा बनकर, प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालन केशव बावणे यांनी केले तर आभार प्रदर्शन अरविंद मेश्राम यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी लंकेश बावणे, श्यामसुंदर कोसरे ,श्यामसुंदर मेश्राम, युवराज बावणे ,रवींद्र बावणे व समाज बांधवांनी सहकार्य केले.