नमन माऊली स्मृतिदिनी
तुझ्या आठवे आठवणी
ह्रदयी कृतज्ञता जपूनी
साऊ मनात साठवणी..
ती अडाणी दीनवाणी
शिक्षणरुपी दान पदरी
टाकुनी केले शहाणी
स्वकष्टे सोसून जीवनी....
अंधश्रद्धा जुनाट रुढी
संघर्ष तू सतत करुनी
स्विकारुनी स्वकीय रोषा
दिली नवयुगात शिकवणी..
सज्ज जाहलो रणांगणी
शस्त्रही हाती लेखणी
वीरांगना देइ ग्वाही
स्त्रीशक्ती अतुट बांधणी
सावित्रीचा वसा घेऊनी
सरसावलीहि नवसनातनी
ज्योतीसह मशाली बनूनी
उजळे स्वतेजे प्रकाशूनी
अँड. मंगला नागरे
कारंजा (लाड) जि.वाशिम
.
आपल्या प्रतिक्रिया द्या....
=================================
Post Views:
278
FaceBook Page
संबंधित बातम्या