गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात नेटवर्क नसल्याने जवळच्या जवळही फोन लागत नाही. तर इंटरनेट चालत नाही. या प्रकाराने ग्राहक त्रस्त झाले आहे. नेटवर्कसाठी परिसरात शोधाशोध सुरू झाले आहे. त्यामुळे ग्राहकच एकमेकांना भाऊ नेटवर्क कुठे मिळेल असे विचारताना दिसत आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील बाराभाटी परिसरात चार मोबाइल पाच कंपनीचे टॉवर आहेत. पण कोणते नेटवर्क चालते हे समजत नाही. बाराभाटी येथे वोडाफोन कंपनी, देवलगाव येथे जीओ कंपनी, कुंभीटोला येथे रिलायन्स आदी चार कंपन्याच्या टॉवर आहेत. ग्राहक विविध कंपन्यांचे सीमकार्ड वापरत, पण काही फायदाच होत नाही. कंपनीने टॉवर लावले. पण ते नियमित सेवा देत नसल्याने मोबाइल ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच ग्राहकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने त्यांची डोकेदुखी वाढली आहे.