झालेल्या माहितीनुसार आरमोरी तालुक्यातील देलनवाडी- मानापुर रोडवर असलेल्या धाईत राईस मिल जवळ मानापूर येथील निखिल घनश्याम ठाकरे (25) हा तरुण आज सायंकाळी अंदाजे 5.30 वाजता टेम्पोला जबर धडक दिल्याने गंभीर जखमी झाल्याची माहिती प्राप्त झालेली आहे.
सदर तरुण दुचाकीने देलनवाडी वरून मानापुर कडे जात होता तर टेम्पो मानापुर वरुन देलनवाडी येत असताना समोरासमोर दोन्ही वाहनाची जबर धडक बसली. या धडकेत दुचाकी वाहन चालविणारा निखिल ठाकरे या तरुणाच्या डोक्याला जबर मार बसल्यामुळे घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्त सांडल्याचे घटनास्थळी दिसत आहेत.
या घटनेची गावातील नागरिकांना तात्काळ माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर तरुणाला डोक्याला मोठ्या प्रमाणात मार बसल्यामुळे त्याला गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयामध्ये हलवल्याची माहिती प्राप्त झालेली आहे