कारंजा : (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे)चालू वर्षी अल निनोच्या प्रभावाने,पावसाला फारच जास्त विलंब झालेला होता.आणि त्यातही महत्वाचे म्हणजे स्वतः शासनाने,जोपर्यंत 90 ते 100 मिलि पाउस होत नाही तोपर्यंत, शेतकऱ्यांनी पेरण्या करूच नये. अशा प्रकारच्या वारंवार सूचना दिल्यामुळे,कारंजा तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण वाशिम जिल्ह्यातील पेरण्या रखडलेल्या होत्या.परंतु गेल्या दि 3 जुलै पासून, जिल्ह्यात कोठे ढगपुटीसदृश्य,तर कोठे बऱ्यापैकी,व कोठे रिमझिम का होईना ? पण बहुतांश भागात बऱ्यापैकी पाऊस पडल्यामुळे बळीराजा सुखावला असून,गेल्या तिन चार दिवसात खरिपाच्या पेरणीला वेग आल्याचे दिसून येत असून, या आठवड्यात बहुंताश पेरणीची कामे पूर्ण होणार आहेत. यंदा सोयाबिन,तुर व कपाशीच्या पेरण्या होत आहेत.जून महिन्यात जरी पाऊस पडला नसला तरी जुलै महिन्यात उच्चांकी पाऊसाची नोंद होईल. व पिके चांगली बहरतील असा आशावाद मायबाप शेतकरी बाळगून असल्याचे वृत्त हिंमत मोहकर यांनी कळवीले आहे.