डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे संस्थेचे महासंचालक सुनील वारे यांच्या मार्गदर्शनाखाली अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरिता आर.टी.ई अंतर्गत प्रवेश मिळण्याकरिता मोहीम आयोजन करण्यात आले आहे. शिक्षण हक्क कायदा (आरटीई) प्रवेश नोंदणी 13 जानेवारी 2025 पासून सुरू करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर बार्टी च्या माध्यमातून प्रचार प्रसार व विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून घेण्याकरिता मैट्रो सिटी मध्ये 6 समतादूत आणि जिल्हा 4 समतादुत असे एकुण 154 समतादूतांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या संदर्भात समतादुत यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात अनु. जाती च्या वस्तीमध्ये जाऊन प्रचार करुन पात्र विद्यार्थ्यांची यादी करुन ऑनलाइन फॉर्म भरून देणे या सुचना देण्यात आल्या आहेत.ज्या ठिकाणी अनु. जाती च्या वस्ती मध्ये बार्टी चा RTE मदत केंद्र अन्तर्गत समतादूत असणार आहेत.या सर्व प्रक्रियेचा समाजातील नागरिकांना उच्चस्तरवरिल English Medium च्या शाळा ची फी भरणे शक्य होत नाही अशा शाळामध्ये प्रवेश घेउन मुलाना गुणवत्ता असलेले शिक्षण मिळणार आहे. जेणेकरून अनुसूचित जातीतले विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही.-जेव्हा पासुन शिक्षण मंडळाची ऑनलाइन फॉर्म भरण्याची वेब साईट सुरु होईल तेव्हा पासुन ऑनलाइन फॉर्म भरणे सुरु होईल परंतू आता ऑफलाईन प्रचार प्रसार करने सुरु असुन मुलांचे नाव व महीती घेणे सुरु आहे. तुमचा कोट
ज्या पालकांना ऑनलाइन अर्ज भरता येत नाहीत व त्यासाठी cyber cafe मध्ये पैसे द्यावे लागतात त्यांना सुवर्ण संधी आहे आपल्या बार्टी च्या RTE मदत केंद्रा मध्ये मोफत ऑनलाइन अर्ज भरून मिळतील.
अधिक माहिती करिता बार्टी हेल्पलाईन वर संपर्क साधावा असे आवाहनही बार्टी, महासंचालक सुनील वारे यांनी केले आहे. असे वृत्त समतादूत प्रणिता दसरे यांनी कळवीले.