अकोला:-
रेल्वे प्रवास्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान ना नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली खासदार संजय धोत्रे कातीबद्द असून गेल्या १० वर्षांमध्ये अनेक प्रकल्प मार्गी लागले असून पिट लाईन तसेच उत्तरभारतात रेल्वे व वंदेमातरम सुरु करण्याचे दृष्टीने खासदार धोत्रे प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन अकोला पूर्व व भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
स्थानिक रेल्वे स्थानक संकटमोचन हनुमान मंदिर परिसरात पंतप्रधान ना नरेंद्र मोदी यांचे शुभ हस्ते ८५ हजार कोटी रेल्वे प्रकल्प व 1 लाख कोटी रुपयाच्या विविध योजनांचे लोकार्पण व भूमी पूजन समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी जिल्हा भाजपा अध्यक्ष किशोर पाटील मांगटे हे होते तर आमदार हरीश पिंपळे, जयंत मसने, अनुप संजय धोत्रे, उन्मेष मालू, कृष्ण शर्मा स्वानंद कोन्दोलीकर, विमल जैन सुभाषसिंग ठाकूर, girish जोशी देवाशिष काकड, सुमनताई गावंडे, विमल जैन, चंदाताई शर्मा, वैशाली देवकाटे, मालती रणपिसे, संजय गोटफोडे, विवेक भरणे, रामनारायण मिश्रा, अनिता चौधरी, राहुल देशमुख, राजेश नागमते. पंकज पळसपगार, देवेंद्र देवर, उकंडराव सोनोने, मिलिंद राऊत, राजेंद्र गिरी आदी प्रामुख्याने मंचावर विराजमान होते.
या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा योजनेंतर्गत स्थानिक कामगरांना आपल्या वस्तू व कला साठी मार्केट रेल्वे स्टेशनवर विक्रीसाठी STALL उपलब्ध करून देण्यात आले आहे त्यामुळे रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत. २०२४ वर्षाच्या या नवीन वर्षाच्या ७५ दिवसामध्ये ७० लाख कोटी रुपयाचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले आहे. निवडणूक लक्षात घेऊन आम्ही काम करीत नसतो तर विकसित नवभारत करण्याचा आमचा संकल्प आहे. २००४ मध्ये योजना सरकारनी केल्या पं सन २०१४ पर्यंत अर्धा कि.मी. सुद्धा रेल्वेची कामे करण्यात आली नाही. केवळ रेल्वे चे थांबे यामध्ये ते धन्यता मनात होते. आम्ही रेल्वे प्रवास्यांना सुविधा देऊन ७०० रेल्वे स्थानकांचे अत्याधुनि करण करण्यात यशस्वी ठरलो आहे. एवढेच नव्हे तर देशातील सात राज्याच्या राजधान्या रेल्वे मार्गाशी जोडल्या नव्हत्या. रेल्वे प्रवास्यांना तिकीट आणि आरक्षण तसेच रेल्वे डब्यामध्ये बसण्यासाठी व गाड्या उशिरा धावत होत्या त्या वेळेवर आणून ३०० नवीन रेल्वे सुरु करण्यात आम्ही यशस्वी ठरलो हीच मोदींची विकासाची ग्यारंटी असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी ९ राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल अकोला रेल्वे स्थानकावर आमदार हरीश पिंपळे यांनी अकोल्याच्या रेल्वेच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त निधी उपलब्ध करून विकास कामाचा साक्षीदार होण्याची संधी पंतप्रधान ना नरेंद्र मोदी यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त करून अकोला रेल्वे स्थानकावर जनऔषधी, स्वयंचलित जिना, लिफ्ट, तसेच अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात खासदार संजयभाऊ धोत्रे यशस्वी ठरल्याचे प्रतिपादन केले. रेल्वे चे अधिकारी हिरालाल मीना, स्टेशन मास्तर कवडे, विनायक राऊत, अनिल तिवारी, वाघमारे, गौतम मुसळे आदी अधिकारी मोठ्या संख्याने उपस्थित होते. या वेळी कामगार, रेल्वे कर्मचारी, व्यापारी, प्रवासी, भाजपा पदाधिकारी, महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी पाहुण्यांचे स्वागत रेल्वे कर्मचाऱ्यानमार्फत करण्यात आले. तसेच घोषणा देण्यात आल्या.
आपल्या प्रतिक्रिया द्या....