मालेगाव येथे दि. ११ ऑक्टोबर रविवार रोजी विश्राम गृह मालेगाव येथे. व्हाईस ऑफ मिडियाची होणाऱ्या शिर्डी येथील दोन दिवस अधिवेशना विषयी माहिती व चर्चा या संदर्भात कार्यक्रमाला जाण्याची रूपरेषा, ठरवण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जस्ट पत्रकार पखाले सर हे होते. मार्गदर्शक व्हाइस ऑफ मीडिया जिल्हाध्यक्ष भागवत मापारी हे होते, कार्यक्रमाचा प्रस्तावित, व्हॉइस ऑफ मिडिया तालुकाप्रमुख अजय चोथमल यांनी केले. तर कार्यक्रमाचे संचालन, व्हॉइस ऑफ इंडिया साप्ताहिक विंग तालुकाप्रमुख गणेश पाटील लहाने यांनी केले, तर आभार, व्हॉइस ऑफ मीडिया मालेगाव शहर अध्यक्ष, अमोल कल्याणकर यांनी मानले, कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती, जिल्हा अध्यक्ष भागवत मापरी, जेस्ट पत्रकार सुधाकर पखाले सर, ज्येष्ठ पत्रकार अनंता कुटे, तालुकाध्यक्ष अजय चोथमल, मालेगाव शहर अध्यक्ष अमोल कल्याणकर सर, सचिव सचिन साठे, शे. सलीम शेख. अमीर, केशव इंगळे, गणेश लहाने यांच्या सह या वेळी व्हाईस ऑफ मिडियाचे मालेगाव तालुक्यातील पत्रकार बांधव बहुसंख्य नि उपस्थित होते. तर शिर्डी येथे होणाऱ्या दोन दिवसीय अधिवेशनना मालेगाव तालुक्यातील व्हाईस ऑफ मिडिया चे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.