महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने डीजीटल सदस्य नोंदणी कार्यक्रम हाती घेतला आहे. महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष श्री. नानाभाऊ पटोले यांच्या आदेशनुसार व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व विविध निवडणुकीच्या अनुषंगाने ब्रम्हपुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात काँग्रेसची डीजीटल सभासद नोंदणी करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने ब्रम्हपुरी तालुक्यातील सर्व गावांतील व शहरातील प्रत्येक बुथ कमेटी मधील नोंदणीकर्ते, सोशल मीडिया प्रमुख, ग्राम काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष यांची बैठक आज दिनांक २१-०३-२०२३ दुपारी १२.०० रोजी ब्रम्हपुरी येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली.
यावेळी सदर बैठकीला ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, ब्रम्हपुरी शहर काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष श्री. हितेंद्र राऊत, जि.प. सदस्य डॉ राजेश कांबळे, जि. प. सदस्या सौ. स्मिताताई पारधी, डीजीटल सभासद नोंदणी मोहीमेचे ब्रम्हपुरी-चिमुर विधानसभा समन्वयक तथा पं. स. सदस्य थानेश्वर कायरकर, नगरसेविका सुनिताताई तिडके, नगरसेविका वनिताताई अलागदेवे, शहर महिला काँग्रेस अध्यक्ष योगिताताई आमले, माजी जि. प. सदस्य भावना ईरपाते, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, माजी सरपंच राजेश पारधी, पत्रकार गोवर्धन दोनाडकर, युगल नागदेवते, प्रतीक नरड, व्यंकटेश भाजीपाले, मयुर सहारे यांसह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. काँग्रेस पक्षाच्या डीजीटल सदस्य नोंदणी मोहीमेअंतर्गत प्रत्येक घरापर्यंत जाऊन नोंदणीकर्ते काँग्रेस पक्षाच्या विचारांना मानणाऱ्या नागरिकांना काँग्रेस पक्षाचे डीजीटल सदस्य बनवणार असुन नागरिकांनी सुध्दा त्यांना सहकार्य करावे असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले.