दिनांक 29/5/2025 रोजी श्री संत नत्थुबाबा मोझरकर महाराज संस्थान मोझर इजारा ता. दारव्हा जि. यवतमाळ द्वारा आचार्य श्री हरिभाऊ वेरुळकर गुरुजी संचालक श्रीगुरुदेव राष्ट्रधर्म प्रचार समिती गुरूकुंज व स्वामी अनंतरानंद महाराज रामकृष्ण मिशन विवेकानंद मेमोरियल वडोदरा गुजरात यांचे प्रेरणेने व मार्गदर्शनानुसार आयोजित 8 दिवसीय श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिर समारोपीय कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ह.भ.प. श्री. मधुकरराव आगळे महाराज तर प्रमुख अतिथी म्हणून श्री. विनोदभाऊ खोडे माजी जि.प. सदस्य, ठाणेदार श्री. विनायक लंबे लाडखेड हे उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून श्री. नामदेवराव गव्हाळे महाराज जीवन प्रचारक अमरावती, श्री.पंकजपाल महाराज सप्तखंजिरी वादक, श्री. गणेश धर्माळे जिल्हा सेवाधिकारी पुसद, श्री.ओंकार हराळ मुख्याध्यापक मोझर, प्रा.श्री.धनंजय कोठाळे, श्री.पुरुषोत्तम बैसकार, श्री.धर्मेंद्र पाटील, श्री.मोहन ठाकरे हे प्रामुख्याने उपस्थित होते तसेच सरपंच सौ. बेबीताई शहाणे, उपसरपंच ज्ञानेश्वर इनवाते सर्व सदस्य ग्रामपंचायत, संस्थानचे विश्वस्त, पालकवृंद, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांचे हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. गुरुदेव हमारा प्यारा या संकल्प गीताने कार्यक्रमाची सुरवात झाली. स्वागत गीत शिबिरार्थी संच यांनी सादर केले. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सदस्य ह्यांचे हस्ते कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी ह्यांचे स्वागत करण्यात आले. पियूष दोडके, सुकन्या चौधरी, हर्षल बनारसे ह्या शिबिरार्थी ह्यांनी मनोगत व्यक्त केले. शिबिरार्थी ह्यांनी सूर्यनमस्कार, योगासने ह्यांचे प्रात्यक्षिक सादर केले.परम रितेश ठाकरे ह्याने नौली क्रिया सादर केली. त्यानंतर शिबिरार्थी मुले, मुली ह्यांनी लेझिम सादरीकरण केले. श्लोक, भगवतगीता, ग्रामगीता ओव्या शिबीरार्थी ह्यांनी सादर केल्या. लाठीकाठी प्रात्यक्षिक शिबीरार्थी मुले मुली ह्यांनी सादर केले. फायर रिंग जंप व मल्लखांब प्रात्यक्षिक पाहून सर्व प्रेक्षक ह्यांनी विद्यार्थी ह्यांचे कौतुक केले. आदर्श विद्यार्थी सन्मान पियूष मनीष दोडके मोझर ह्यास प्राप्त झाला तसेच अंतिम लेखी चाचणी मध्ये प्रथम कु. सुकन्या प्रवीण चौधरी मोझर, द्वितीय क्रमांक कृष्णा मनोहर गावंडे शेंद्री डोलारी, तृतीय क्रमांक लकी दशरथ पारधी उमरठा ह्यांनी प्राप्त केल्याबद्दल सन्मान मोमेंटो, प्रमाणपत्र, शैक्षणिक साहित्य कीट ,स्वामी विवेकानंद चित्रमय चरित्र पुस्तक देवून सन्मानित करण्यात आले. तसेच उपस्थित मोझर, आमशेत, उमरठा, दिघोरी, वडगाव, येथील सर्व शिबीरार्थी ह्यांना प्रमाणपत्र, शैक्षनिक कीट, स्वामी विवेकानंद पुस्तक भेट देण्यात आले. मान्यवरांचे हस्ते मुख्य शिक्षक गोपाल गायकवाड, संगीत शिक्षक गौरव काळे, व्यायाम शिक्षक आदित्य मोहळे, योगा प्राणायाम शिक्षक अंकुश चव्हाण, लेझिम शिक्षक बाबाराव वायकुळे ह्यांनी 8 दिवस प्रशिक्षण दिल्याबद्दल, मोमेंटो, शाल, ग्रंथ, पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले. सर्व मान्यवर ह्यांनी मनोगत व्यक्त करीत असताना संस्थान द्वारा ग्रामीण विद्यार्थी यांचे करिता आयोजित श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिराचे माध्यमातून संस्कारी विद्यार्थी घडविण्याचे कार्य गेल्या 5 वर्षापासून या शिबिराद्वारे करीत असल्याबद्दल अभिनंदन केले. व शिबिरार्थी व उपस्थित पालक ह्यांना मार्गदर्शन केले. सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली. कार्यक्रमाचे संचलन ज्ञानराज बैसकार केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव निवृत्तीनाथ बैसकार ह्यांनी करून आयोजित उपकमाची माहिती दिली. आभार प्रदर्शन विवेक बैसकार ह्यांनी केले. राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यानंतर सर्वांना महाप्रसाद मिष्टान्न भोजन देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संस्थेचे अध्यक्ष नेमिनाथ बैसकार, उपाध्यक्ष धनंजय कोठाळे, सचिव तसेच शिबिर व्यवस्थापक निवृत्तीनाथ
बैसकार व सर्व विश्वस्थ सदस्य, विवेक बैसकार, ज्ञानराज बैसकार,अमोल जवळकार, विलास वाघमारे, कुणाल चव्हाण, रितेश ठाकरे वडगाव, पांडुरंग घोडे उमरठा ह्यांनी परिश्रम घेतले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....