चंद्रपूर, दि. 11 : जिल्हा परिषद ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीने 12 सप्टेंबर रोजी 11 वाजता प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृह येथे मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान जिल्हास्तरीय एक दिवसीय कार्यशाळा, आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार वितरण सोहळा, संपूर्णता अभियान सन्मान पुरस्कार वितरण सोहळा आणि जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
जिल्ह्यातील 15 पंचायत समितीमधून निवड समितीद्वारे जिल्हा शिक्षक पुरस्काराकरिता शिक्षकांची निवड झाली आहे.
प्राथमिक विभागात : 1. प्रदीप टिपले, जि. प. उ. प्रा. आदर्श शाळा, चिंचाळा (ता. चंद्रपुर), 2. सविता झाडे जि. प. प्रा. शाळा गोंदेडा (चिमूर), 3. कुणाल दुधे जि. प. प्रा. शाळा बेलगाव,(देश) (वरोरा), 4. राजकुमार मुन जि. प. उ. प्रा. शाळा चिखली, (बु.) (जिवती), 5 गीता साखरे जि. प. उ. प्रा. शाळा फिस्कूटी, (मूल), 6 कामिना आत्राम जि. प. उ. प्रा. शाळा बेलगाव, (सावली), 7. प्रशांत साखलवार जि. प. उ. प्रा. शाळा आंबेधानोरा, (पोंभुर्णा), 8. अजय मुसळे जि. प. उ. प्रा. शाळा चिरादेवी, (भद्रावती), 9. सुनिल पोटे जि. प. प्रा. शाळा कळमना, (बल्लारपुर), 10. गोवर्धन टिकले जि. प. उ. प्रा. शाळा जुगनाळा, (ब्रह्मपुरी), 11. अर्चना मरघडे जि. प. उ. प्रा. शाळा, पळसगाव ,(खुर्द) (नागभीड), 12. सुभाष पावडे जि. प. प्रा. शाळा, परसोडी, (गोंडपिपरी), 13. धनराज दुर्योधन जि. प. उ. प्रा. शाळा, भुरकुंडा (बु.) (राजुरा), 14. मंगला उरकुडे जि. प. उ. प्रा. शाळा, कढोली (खुर्द) (कोरपना), 15.अ. अजीज अ. मुजीब शेख जि. प. उ. प्रा. शाळा, नाचनभट्टी, (सिंदेवाही).
अपंग/विशेष/कला शिक्षक पुरस्कार राहुल वैद्य जि. प. उ. प्रा. आदर्श शाळा, चिंचाळा, (चंद्रपुर) यांना तर :- माध्यमिक विभाग पुरस्कार राजू हिवंज जि. प. हायस्कूल तथा कनिष्ठ महा. भद्रावती यांना जाहीर करण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अश्विनी केळकर यांनी कळविले आहे.
००००००
आपल्या प्रतिक्रिया द्या....