विधवांच्या सन्मानासाठी पेटविलेल्या यज्ञात स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन विधवा सन्मानासाठी केलेले कार्य अतुलनीय आहे आणि ते चिरकाल स्मरणात राहील असे प्रतिपादन रिधोरा ग्राम सरपंच विशाल दंदी यांनी केले .
सरपंच वीरस्त्री लताताई देशमुख यांच्या 48 व्या जयंती सोहळ्याच्या अध्यक्षपदी बोलत होते .
वीरस्त्री स्वर्गीय लताताई देशमुख प्रेरित स्वामिनी विधवा विकास मंडळ व सामिनी संघटनेच्या वतीने ४८ जेष्ठ विधवा महिलांना लुगडे तसेच दहा विधवांना साडी देऊन सन्मानित करून वीरस्री लताताई देशमुख यांची जयंती सामाजिक उपक्रम राबवून साजरी करण्यात आली. यावेळी सर्व विधवा महिलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता .
यावेळी व्यासपीठावर अध्यक्षपदी सरपंच विशाल दंदी यांचेसह समाजसेविका चित्रा पाठक, समाजसेविका पुष्पा वानखडे आणि कमल देशमुख उपस्थित होते .
निराधार विधवा घटस्फोटीत एकल महिलांच्या विकास मुद्द्यांवर निस्वार्थ लढणारी देशातील एकमेव संघटना म्हणजे स्वामिनी विधवा विकास मंडळ होय . मंडळाच्या संस्थापिका वीरस्री स्व. लताताई देशमुख यांची 27 फेब्रुवारी रोजी जयंती होती त्यानिमित्त रविवार 2 मार्च रोजी जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते . सदर आयोजन म्हणजे विधवा महिलांचा केलेला सन्मान ही लताताईंना खरी श्रद्धांजली ठरली. यावेळी सर्व क्षेत्रातील गणमान्य व्यक्तींनी उपस्थित होते . कार्यक्रमाचे यशस्वीते करिता पी बी धोटे, मनीष देशमुख, सतीश मानकर, स्वप्निल शेंडे, नितीन देशमुख, श्रीमद् देशमुख, सार्थक शेंडे, सोहम ढगे, निर्भय मुंडे , दत्तू दंदी, अजय लंगोटे , वैभव लंगोटे प्रज्वल लंगोटे, अभी कैतवास, रेखा बनसोड, उषा शेंडे, समृद्धी जाधव यांचेसह स्वामिनी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.