कारंजा(लाड) : स्थानिक लहुजी चौक येथे ऍड. ज्योती दाभाडे यांच्या उत्कृष्ट सामाजिक सेवेबद्दल, समाजाच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला. लोकशाहिर अण्णा भाऊ साठे उत्सव समिती व कारंजा मातंग समाज विचार मंच यांच्या संयुक्त विधमाने समाज भूषण ऍड. ज्योती दाभाडे विधी तज्ज्ञ कारंजा यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात करण्यात आला. लहुजी साळवे चौकात येथील परंपरे नुसार या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. चंदनशिवे आणि मित्र परिवार यांनी केले. अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे उपाध्यक्ष विठ्ठल लोंढे, सचिव दशरथ सावळे, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे शहर अध्यक्ष योगेश इंगळे, पत्रकार दामोदर जोंघळेकर , आमटे , दाभाडे गुरुजी, लोंढे , सुभाष पवार, श्याम शिखरे, संजय जोंधळेकर, लताबाई लोंढे माला लोंढे, घोडे ताई,तसेंच महत्वाचे म्हणजे यावेळी समाजाचे ज्येष्ठ नेते असलेले, माजी मंत्री मधुकर कांबळे यांनी सुद्धा फोनवरून ऍड. ज्योती दाभाडे यांना शुभेच्छा दिल्या . याप्रसंगी समाजातील असंख्य महिला पुरुष यांची उपस्थिती होती असे वृत्त महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे.