कारंजा : हाडाचे सामाजिक कार्यकर्ते असलेले,अखिल गुरव समाज संघटना वाशिम जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष - रामेश्वर दत्तात्रय माळेकर यांना नुकतेच दि 24 डिसेंबर 2023 रोजी स्व.हरिश्चंद्र फाऊंडेशन निसर्गाश्रम प्रकल्प, महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमाने स्व. हरिश्चंद्र गायकवाड बहुउद्देशिय संस्था महाराष्ट्र राज्य सोलापूर तर्फे,अखिल भारतिय स्तरावरील राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
त्यामुळे निश्चितच जिल्ह्यातील गुरव समाजाचा रामेश्वर दत्तात्रय माळेकर हे खऱ्या अर्थाने राष्ट्रीय स्तरावरील पहिले गुरव समाजभूषण ठरले आहे. त्याबद्दल कारंजा येथील विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडाळे तथा संघटनेचे उपाध्यक्ष तथा गुरव समाजाचे सक्रिय सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील खंडार यांनी आनंद व्यक्त करीत त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.