मालेगाव : १९७८ ते १९८० मेडशी मतदार संघातील माजी आमदार,पुलोद सरकारमधील एक घटक शरद पवार यांचे विश्वासू,मालेगाव पंचायत समितीचे माजी सभापती, बालाजी सहकारी साखर कारखान्याचे संचालक अशी विविध पदे भूषवली तरी सुद्धा आपले पाय नेहमी जमिनीवर ठेवून शेतकरी,कष्टकरी आणि गरजवंताचे काम करत राहिले. अशी त्यांची ओळख आहे.स्वतःसाठी कधीही त्यांनी कोणती शिक्षण संस्था उघडली नाही.नेहमी नि:स्वार्थीपणे सामान्य माणसाची कामे करणारे माजी आमदार विठ्ठलराव शिंदे यांचे मंगळवार १९ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ०१: १५ मिनिटांनी वृद्धपकाळाने व आजाराने दु:खद निधन झाले. त्यांच्यावर आज सकाळी १२:०० वाजता खंडाळा शिंदे येथे अंतिम संस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच कारंजा येथील त्यांचे मित्र तथा शेतकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते प्रो.नानासाहेब गुल्हाने, माजी सरपंच प्रदिप वानखडे, समाजसेवक संजय कडोळे यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.