अकोला:-एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरारधात अनेक संत महात्मे होऊन गेले ते स्वतः प्रसिद्धीपरांगमुख होते शिवाय त्याकाळी चरित्र लेखनाची प्रथाहि नव्हती म्हणून भावी काळात ते विस्मृतीत गेले श्री शिवचरण महाराज दीडशे वर्षांपूर्वी होऊन गेले त्यांचे चरित्र अज्ञातच राहिले काही जुन्या जाणत्या भक्तांनी सांगितलेल्या आठवणी वरून श्याम भाऊ व्याळेकर यांनी शिवचरण महाराजांचे ओवीबद्ध चरित्र लहिले त्या चरित्राचा आधार घेऊन इन्कमटॅक्स ऑफिस मधून सेवानिवृत्त झालेले अशोक नारायणराव सकळकळे यांनी हे चरित्र कथेच्या रूपात भाविकांसाठी लिहिले आहे, या श्री शिवचरण महाराज कथामृत चा प्रकाशन सोहळा श्री शिवचरण महाराज मंदिरात पार पडला. या प्रसंगी ह.भ.प.राजाभाऊ कोरान्ने आमंत्रित तर..प्रशांत महाराजृ कोरान्ने मठपती बाबाजी महाराज संस्थान अकोला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.अध्यक्षस्थानी श्री नानासाहेब मोहरील होते .प्रमुख पाहुण्यासह अशोक सकळकळे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्री सुधीर देशपांडे यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय श्री गजानन रेलकर, श्री अभय जागीरदार यांनी केला तर आभार प्रदर्शन अरुण मोहरील यांनी केले.आनंद जागीरदार यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.