काँग्रेसने खरी स्थिती आनली समोर; गुन्हा दाखल करण्याची मागणी
चंद्रपूर : स्नेहा फूडस या ऑईल रिफायनरी कंपनीत झालेल्या अपघातात कामगाराचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मात्र कंपनीला विचारणा केली तर जखमीवर नागपूर येथे उपचार सूरू असल्याचे खोटे सांगितले. या अपघातात प्रकरणाची खरी स्थिती काँग्रेसने समोर आनली. दरम्यान काँग्रेसने कपंनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
आठ मे रोजी सकाळी साडे दहा वाजता स्नेहा कंपनी मध्ये सुरक्षा साधनां शिवाय AP 16 - TQ 1555 क्रमांकाच्या ट्रक मध्ये सोयाबीन पावडरचे जड असलेले मोठे - मोठे बॅगा भरत असताना उंची वरून खाली पडून गंभीररित्या जखमी झालेल्या नंदी पेटी बाबू या चाळीस वर्षीय इसमाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मात्र सदर घटनेची माहिती कंपनी तर्फे लपविण्याचा प्रयत्न करण्यात आला. कंपनीच्या मुख्य व्यवस्थापक श्रीवास्तव यांनी तर कहरच केला. काल दुपारी मृत झालेल्या त्या कामगारांचा नागपुरात उपचार सुरू असल्याची खोटी माहितीच दिली. मात्र काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी व कामगार नेते सैय्यद अनवर हे दिनांक 09 मे रोजी कार्यकर्त्यांसह कंपनीत गेले तेथून ज्या वाहनात सोयाबीन पावडर भरताना अपघात घडला त्यांच्या मालकाशी संपर्क साधून कामगारांच्या मृत्यूचा भांडाफोड केला. गेल्या महिन्या दीड महिन्यापूर्वी स्नेहा कंपनीत विद्युत शॉक लागून एका परप्रांतीय कामगारांचा दुर्देवी रित्या मृत्यू झाला असता सदर मृतदेह शासकीय रुग्णालयात ठेवून कंपनी अधिकाऱ्यांनी पळ काढला होता.या कंपनीत सर्व शासकीय नियम धाब्यावर बसवून 80% परप्रांतीय कामगार कामावर घेतले असून त्यांना कुटल्याही प्रकारची सुरक्षा न पुरविता त्यांना बंधवा मजुरा सारखी वागणूक दिल्या जात आहे. आज घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस तर्फे कंपनीच्या मुख्य गेटवर जोरदार निर्दर्शने व घोषणाबाजी करण्यात आली.
या कंपनीवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा व मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मोबदला देण्याची मागणी काँग्रेसने केली. कंपनी अधिकाऱ्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी घुग्घुस पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले याप्रसंगी रोशन दंतलवार, मोसिम् शेख, रफिक शेख, देव भंडारी, रोहित डाकुर, आरिफ शेख, कपिल गोगला, साहिल सैय्यद, सुनील पाटील, अंकुश सपाटे, बालकिशन कूळसंगे व पदाधिकारी उपस्थित होते.