ब्रम्हपुरी:-
तालुक्यातील ग्रा.पं.बरडकिन्ही येथे मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत स्वच्छ्ता हीच सेवा अभियान दिनांक:- १ ऑक्टोंबर २०२३ ला सकाळी १०:०० वाजता राबविण्यात आले.
मेरी मिट्टी मेरा देश अभियानाअंतर्गत "स्वच्छता हीच सेवा" अभियान म्हणजे "कचरामुक्त भारत" हा उपक्रम आहे.
या उपक्रमानिमित्त गावातील परीसर स्वच्छ करून तसेच घरोघरी जावून मूठभर धान्य व मूठभर माती कलश मध्ये जमा करण्यात आली.
मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत स्वच्छ्ता हीच सेवा अभियान उपक्रमाला सरपंच श्री, मनोज बन्सोड, उपसरपंच श्री.भास्कर गोटेफोडे, श्री.ओमदेव ठाकरे सदस्य,श्री,वसंता बगमारे सदस्य श्री. एच.बी.तलांडे सचिव,
सौ. संगीता पाकडे सदस्या, सौ.संदेशा गुरूनुले सदस्या, सौ,सुचिता दाणी सदस्या, सौ,सुनीता मेश्राम सदस्या, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशावर्कर, ग्रामसंघातील पदाधिकारी ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामपंचायत संगणक चालक, रोजगार सेवक उपस्थीत होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....