गडचिरोली :- जंगलात चरण्यासाठी गेलेल्या गायीवर झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून दोन गायींना ठार व एका गायीला जखमी केल्याची घटना ३० जून रोजी सकाळच्या सुमारास पोटेगाव वनपरिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या दक्षिण पोटेगाव नियतक्षेत्र उत्तर मारदा कक्ष क्रमांक ९१ मध्ये घडली.
राजोली येथील पशुपालकांनी आपली गुरे चरण्यासाठी नेहमीप्रमाणे जंगलात सोडली होती. दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने जनावरांच्या कळपावर हल्ला करीत दोन गायींना जागीच ठार केले. तर एका गायीला गंभीर जखमी केले.घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी एन. एन. तांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रसहायक जे. एन. सोरदे यांनी आपल्या चमूसह घटनास्थळी दाखल झाले. मृत गायींचा पंचनामा करून शालीकराव राय सिडाम, पंकज कन्नाके रा. राजोली यांना शासनाकडून योग्य मदत मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले घटनास्थळावरील वाघाच्या पायाच्या ठशावरून त्याच्या ये-जा करणाऱ्या मार्गाचा शोध घेत घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे