अकोला:-
'धर्माचा खरा अर्थ समजून राजधर्माचे पालन करत' आपल्या घराण्याचे नाव ही मुलगी जगात अजरामर करेल, असे जणू संकेतच मल्हाररावांना मिळाले . इंदुरहून पुण्यात येतांना त्यांनी मंदिरातून निघालेल्या एका भाविक मुलीला बघितले. आपल्या खंडेराव मुलासाठी या मुलीची मागणी वडिल माणकोजीरावाकडे केली. नकाराचा प्रश्नच नव्हता. पेशव्यांचे कर्तबगार सरदार अशी मल्हारराव होळकर यांची ख्याती होती.
*मल्हाररावांची निवड एवढी योग्य होती की यामुळे इतिहास लिहला गेला. अहिल्यादेवीं होळकर यांचा जन्मशताब्दी साजरा करण्याचा सौभाग्य मिळाला आजही त्यांची विचार समाजाला प्रेरक असल्याची व सनातन धर्माला गौरव करणारे असल्याची प्रतिपादन खासदार अनुप धोत्रे यांनी केले
भाजपा कार्यालयात अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी निमित्त भाजप कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संतोष शिवरकर हे होते तर मंचावर यावेळी आमदार रणधीर सावरकर, किशोर पाटील जयंत मसने, विजय अग्रवाल, रवी गावंडे, माधव मानकर, गिरीश जोशी पवन पाडिया डॉक्टर किशोर मालोकार संजय गोट फोडे, एडवोकेट देवाची काकड रमेश अल्करी अजय शर्मा विजय इंगळे प्रशांत अवचार सुनील बाढे राजेंद्र गिरी पवन महल्ले दिलीप मिश्रा पंढरी दोरकर चंदू महाजन, विवेक भरणे धुर्वखुणे उमेश श्रीवास्तव, संदीप गावंडे रणजीत खेळकर नितीन राऊत नितेश पाली तुषार भिरड, नितीन ताकवले, सुमन ताई गावंडे, जानवी डोंगरे, संतोष पांडे, विकी ठाकूर आधी प्रामुख्याने उपस्थित होते.
.. माहेर शिंदेचे. चौंढी. ता. जामखेड. जि. अहिल्यानगर ३१ मे १७२५ ते १३ ऑगस्ट १७९५.
८ वर्षीय अहिल्याबाईंंनी होळकर घराण्यात पाऊल ठेवत पूढे 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी' असा हा असामान्य कर्तुत्वाचा प्रवास थक्क करणारा आहे. बालपणी वडिलानी घरी शिक्षण दिले होते. घरात राजकारणाचे धडे मल्हाररावांनी दिले. त्यांच्यावर एकामागोमाग दुःखाचे बरेच आघात झाले. पहिले पती त्यानंतर पित्यासमान सासरे अन् पूढे तरणा मुलगा यांचे निधन झाले. पण न डगमगता राज्यकारभाने मराठा साम्राज्याचा लौकिक देशभर असा वाढवलाय अशा पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर सनातन धर्माची ओळख व मातृ शक्ती शौर्याची प्रतीक असल्याचे आमदार रणधीर सावरकर यांनी याप्रसंगी सांगितले
भारतीय जनता पक्षाने सनातन धर्माची व या देशाच्या परंपरेला रुंदीगत करणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या श्री शताब्दी वर्षानिमित्त देशभरात वेगवेगळे कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात करून त्यांना अभिवादन केले आहे त्यांचा आदर्श घरोघरी पोहोचण्यासाठी पत्रक काढून त्यांचा इतिहास नवीन पिढीला माहिती व्हावा यासाठी तसेच घाट मंदिर शिवमहिमन पाठ शिवनामाचा गजर वेगवेगळे कार्यक्रम भारतीय जनता पक्षाने करून त्यांना अभिप्रेत कार्य केले आहे केवळ गप्पांचा बाजार करता या देशाच्या संस्कृतीसाठी जे जे काही करत यांनी बलिदान केले तो इतिहास जनतेसमोर मांडण्याचा काम भारतीय जनता पक्ष करीत असल्याचीही यावेळी आमदार रणधीर सावरकर यांनी सांगितले काँग्रेस किंवा विरोधी पक्ष तील अन्य घटकांना हे का सुचले नाही असाही सवाल त्यांनी केला.
देशभरात कुठल्याही तीर्थाला जा, या अहिल्याबाई होळकरदेवींच्या कार्याचे दर्शन घडतेच.*अशा शब्दात त्यांच्या कार्याचा गौरव व अभिवादन जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर यांनी केले.
*धर्माचा खरा अर्थ समजून त्या सती गेल्या नाहीत. कुणी सती गेल्याचा उल्लेख धर्मग्रंथात नाही हे पटवून दिले. मल्हाररावांनी त्यांच्याकडे कारभाराची जबाबदारी सोपवली होती. तो कारभार एवढा पारदर्शक होता की पूढे त्यांनीच कारभार करावा अशी जनतेची मागणी होती. यामुळेच पेशव्यांनी माळवा प्रांताच्या सरदारकीची वस्त्र त्यांना दिली. याला विरोध करणाऱ्या तुकोजीराव होळकर यांना आपले सेनापती नेमत त्यांच्यासह राज्यात दिमाखात परतत बुद्धीचातुर्याचे दर्शन घडवले. अशा अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन करणे राष्ट्रभक्तांचे कर्तव्य*असल्याचे प्रतिपादन किशोर पाटील यांनी केले
छत्रपती शिवरायांना अभिप्रेत सुराज्य कसे हे त्यांनी राज्यकारभारातून सिद्ध केले. अशा शब्दात त्यांना अभिवादन विजय अग्रवाल यांनी केले. इतिहासकार त्यांच्या कर्तुत्वाची तुलना इंग्लंडच्या, रशियाच्या, डेन्मार्कच्या राणीशी करतात.
पुण्यश्लोक म्हणजे ज्याने पुण्य कमावले आहे असे. पुण्यश्लोक, विरांगणा, धर्मरक्षक, कर्तुत्ववान.. पराक्रमी.. धर्मपरायण पण सुधारणावादी राज्यकर्त्या.. चाणाक्ष राजकारणी.. प्रजाहितदक्ष.. न्याय कारभारी दूरदृष्टीचे नेतृत्व. घोडसवारी.. शस्त्रे चालवणे यात तरबेज होत प्रत्यक्ष रणांगणावरही उतरायच्या. अंधश्रद्धांना दूर करणाऱ्या सुधारणावादी.. अशी त्यांची बहुआयामी वैशिष्ट्ये. त्यांनी ३० वर्षे राज्यकारभार केला. त्यांचा इतिहास नवीन पिढीला व्हावा यासाठी पक्षाने वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले आहे असे प्रतिपादन जयंत मसने यांनी केले.
प्रजाहित दक्ष . सती प्रथेला त्यांनी विरोध केला. विधवांना दत्तक हक्क आणि मालमत्तेचा अधिकार मिळवून दिला. महिलांना सैन्यात स्थान दिले. राणींनी मुलीसाठी वर निवडतांना अट ठेवली की जी व्यक्ती डाकू.. गुंडांचा बंदोबस्त करेल त्याला जात न बघता मुलगी देईन, आणि हा शब्द त्यांनी खरा केला. जनता निर्भय व्हावी हा त्यामागचा त्यांचा उद्देश होता.
राज्यात शेतकरी.. व्यापारी.. जनता यांना सुखात ठेवले. राज्यात विकास व्हावा म्हणून आपल्या राजधानीत.. महेश्वरला काही विणकर नेले. त्यांच्या व्यवसायाला सुविधा.. संरक्षण.. प्रोत्साहन दिले. त्यामुळेच हजारो लोकांना आजही रोजगार उपलब्ध झाला आहे. महेश्वरी साडी आजही देशविदेशात प्रसिद्ध आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या दूरदृष्टीच्या राजमाता यांचा300 जन्म शताब्दी निमित्त वेगवेगळे कार्यक्रम भारतीय जनता पक्षाने देशभरात सरकार आणि भाजपाने साजरे करून त्यांचा इतिहास जनतेसमोर मांडला आहे अशी यावेळी रवी गावंडे यांनी सांगितले
अनेक किल्ले बांधले. राज्यात चांगले रस्ते बांधले. आपल्या राज्यात तसेच देशभर तीर्थक्षेत्री रस्ते.. बारव.. विहिरी.. धर्मशाळा बांधल्या. अनेक मंदिरांची पूजा व्यवस्था केली. त्यांनी पहिली राजधानी इंदुर त्याकाळातच सुंदर केली. पूढे महेश्वरलाही चांगले शहर निर्माण केले.
शेतकरी असो वा उद्योजक यांना प्रोत्साहन दिले. योग्य कर रचना आणि पारदर्शक कारभार यामुळे राज्यात उत्पन्नही वाढवले. त्यांनी उपद्रवीना शेती.. रोजगार देत सन्मार्गाला लावले. राजदरबारात कलावंत.. ज्ञानींना स्थान दिले. अनंत फंदी असो वा मोरोपंत यांना दरबारात स्थान दिले. राज्यात भयमुक्त वातावरण निर्माण केले. शेतकरी सुखी व्हावे म्हणून शेकडो विहीरी.. तलाव बांधले.
त्यांनी तिर्थक्षेत्री नदीवर घाट बांधले. मंदिरांचा जिर्णोद्धार केला. धर्मशाळा बांधल्या. आज देशभरात अगदी दूरवरच्याही प्रत्येकच तिर्थक्षेत्री अहिल्याबाईंचे काहीतरी कार्य आहेच मग काशी.. बद्रिकेदारनाथ असो की अयोध्या असो. यामुळेच आज अयोध्या नगरीत अहिल्याबाईंचा पुतळा उभारलाय. लोकांच्या मनात स्वराज्याचा विश्वास निर्माण व्हावा म्हणून महंमद गझनीने उध्वस्त केलेल्या सोरटी सोमनाथ मंदिराजवळ शिवमंदिर बांधले. हीच गोष्ट काशी विश्वनाथ मंदिरासह अनेकदा मंदिरांना मदतीची. त्यांच्या धर्मशील.. उदार हृदयी कार्याने या महाराणींना लोक त्यांना देवी संबोधतात.अशा राजमाता चा इतिहास जनतेसमोर मांडण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केला आहे त्यांना अभिवादन करणे हे कर्तव्य असले तरी प्रत्येक सनातन मध्ये इतिहास समोर गेले पाहिजे असे यावेळी गिरीश जोशी म्हणाले.
त्या शिवभक्त.. म्हणूनच त्यांनी राजधानी इंदूरहून महेश्वरला नेली. हाती शिवलींग घेत न्यायनिवाडा करायच्या. आजही इंदूर असो वा नर्मदा किनाऱ्यावरची त्यांची राजधानी महेश्वर.. त्यांच्या कार्याचे साक्षीदार आहेत. जगभरातील लोक महेश्वरला येतात. मराठा साम्राज्याच्या या थोर पराक्रमी राणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जन्मदिनी विनम्र अभिवादन करतात अशा शब्दात माधव मानकर यांनी आपली मनोगत व्यक्त केली.
यावेळी गणेश तायडे, विजय चौधरी आनंद बलोदे, नवीन जाधव मनोज शाहू, कपिल बुंदीले, केशव हेडा, चंदा ठाकूर, शंकर खोवाल, दीप मनवानी, हिरालाल कुपलानी, आदी प्रामुख्याने उपस्थित होते
आपल्या प्रतिक्रिया द्या....