तालुक्यातील आष्टी गावातील शेतशिवारात एका पट्टेदार वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार सकाळी उघडकीस आली. वाघीण चार वर्षाची आहे. विजेच्या स्पर्शाने या वाघिणीचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सकाळी काही गावकर्यांना ही वाघीण मृत्युमुखी पडलेल्या अवस्थेत दिसल्यानंतर याची माहिती वनविभागाला देण्यात आली. त्यानंतर भद्रावती वनविभागाच्या चमूने घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला व वाघिणीचा मृतदेह चंद्रपूर येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या घटनेचा पुढील तपास भद्रावती वनविभाग करीत आहे.