कारंजा(लाड) : कारंजा येथील जनमाणसांमध्ये लोकप्रिय ठरत असलेले, निवडणूकीच्या माध्यमातून अ भा नाट्य परिषद मुंबईच्या नियामक मंडळावर निवडून गेलेले विदर्भ लोककलावंत संघटनेचे उपाध्यक्ष नंदकिशोर कव्हळकर यांच्या मातोश्री सरस्वताबाई अंबादासपंत कव्हळकर यांचे नुकतेच वृद्धापकाळामुळे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले होते. ही वार्ता भाजपा जिल्हाध्यक्ष तथा कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेंद्रजी पाटणी यांना कळताच भाजपाचे शहराध्यक्ष ललित चांडक तथा सत्यव्रत उर्फ बंटी गाडगे यांना सोबत घेऊन, आमदार पाटणी यांनी नंदकिशोर कव्हळकर यांचे निवासस्थानी जाऊन त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले आहे .