कारंजा : लागोपाठ पाचव्या दिवशीही आज शनिवारी दि. २९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ : १५ वाजता,हवामानतज्ञ पंजाब डख यांच्या अंदाजाप्रमाणे कारंजा शहराला मुसळधार पाऊसाने चांगलेच झोडपून काढले आहे. आज झालेल्या पाऊसाने बाजार पेठेतील व्यावसायिक,ग्राहक आणि कामावरून घराकडे परतणाऱ्यांची चांगलीच दाणादाण उडाल्याचे पाहायला मिळाले असून,केरकचर्याने भरलेल्या,सांडपाण्याच्या तुडूंब नाल्याचे पाणी रस्त्यावरून वाहात असल्याने,रामा सावजी चौक, महात्मा फुले चौक,इंदिरा गांधी चौक, नेहरू चौक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील प्रमुख रस्त्यावर दोन ते चार फुट पाणी वाहत असल्याने,रस्त्याला नदीनाल्याचे स्वरूप प्राप्त झालेले होते त्यामुळे वाहनधारकांना रस्त्यावरून वाहने चालविण्यास त्रास होत असल्याचे दिसून आले.