कारंजा (लाड) : स्थानिक महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा कारंजाच्या वतीने दर्पनकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने त्यांना पत्रकारांकडून विनम्र अभिवादन करण्यात आले.उल्लेखनिय म्हणजे ह्या छोटेखानी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाच्या विद्यमान स्थानिक आमदार सईताई डहाके उपस्थित होत्या तर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुनिल फुलारी, सचिव किरण क्षार,तालुकाध्यक्ष नितीन वाणी,इंजि.विलास राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी सर्वप्रथम आ.सईताई डहाके यांनी दिपप्रज्वलन करून दर्पनकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पन करण्यात आले. पुढे झालेल्या आ.सईताई डहाके व उपस्थित मान्यवरांच्या स्वागत समारोहानंतर आ.सईताई डहाके यांच्या शुभहस्ते सर्वच पत्रकारांना भेटवस्तू देण्यात आल्या.पत्रकार दिनानिमित्त किरण क्षार यांनी प्रास्ताविक केले.यावेळी बोलतांना विजय भड,किरण क्षार यांनी कारंजा येथे पत्रकार भवन (सभागृहाची) अत्यंत आवश्यकता असल्याचा विषय मांडला.त्याला इतर पत्रकारांनी अनुमोदन दिले. त्यानंतर जिल्हाध्यक्ष सुनिल फुलारी,नितीन वाणी,इंजि.विलास देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. करंजमहात्म्य परिवाराचे संजय कडोळे यांनी,पत्रकार हा स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून समाजाच्या डोळ्यातील अश्रू टिपून आपल्या लेखनीद्वारे मांडून अन्यायाला वाचा फोडतो. त्यामुळे पत्रकारांच्या सुखंदु:खातही शासन आणि आमदार यांनी उभे राहीले पाहीजे.मृत्यु पावणाऱ्या पत्रकारांना आर्थिक मदत मिळाली पाहीजे.पत्रकार महामंडळाकडून ग्रामिण व शहरी क्षेत्रातील गरजवंत लघुपत्रकारांना वृत्तपत्रासाठी आर्थिक मदत कर्जरूपाने मिळाले पाहीजे.असे पोटतिडकीने सांगीतले. अध्यक्षीय संभाषणातून आ. सईताई डहाके यांनी दर्पनकार बाळशास्त्री डहाके यांना अभिवादन करून सर्व पत्रकार माझे कुटूंबिय असल्याचे सांगून तुमच्याशी माझे बहिनभाऊ किवां मायलेकाचे नाते असल्याचे सांगून भावनिक प्रतिसाद देत कारंजा ह्या सांस्कृतिक नगरीत पत्रकार सभागृह आणि नाट्यसभागृहासाठी व सर्वोतोपरी सहकार्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे स्पष्ट केले.पत्रकार दिनाच्या ह्या कार्यक्रमाला अंकुश कडू,प्रा.शेख सर,चाँद मुन्निवाले,विजय गागरे,उमेश अनासाने, दिलीप रोकडे,संदिप कुर्हे,श्रीकांत भाके,हफिजखान,गोपाल पाटील कडू ,समिर देशपांडे इत्यादी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचलन कु.वाणी आणि मुख्याध्यापक विजय भड यांनी केले.तर समारोपिय संभाषण एकनाथ पवार यांनी केले.