वाशिम(जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे)व्हाईस ऑफ मिडीया साप्ताहिक विंग वाशिम जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी,सदस्य यांच्यासह वाशिम जिल्हयातील सर्व साप्ताहिकांच्या मालक,संपादक व प्रतिनिधींना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की, पत्रकारांच्या विकासासाठी झटणारी सकारात्मक संघटना व्हाईस ऑफ मिडीया ही अवघ्या दीड वर्षात देशातील २२ राज्यात पोहोचली आहे.आजघडीला संघटनेचे २८ हजारपेक्षा जास्त सदस्य असून आपली संघटना देशात क्रमांक १ वर पोहोचली आहे.या यशामागे संघटनेचे उर्जावान राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्यासह हजारो पदाधिकारी, सदस्यांचे परिश्रम आहेत.
व्हाईस ऑफ मिडीयाचे संस्थापक संदीप काळे सर यांच्या मार्गदर्शनात व साप्ताहिक विंगचे प्रदेशाध्यक्ष विनोद बोरे सर यांच्या पुढाकारात येत्या रविवार,१८ जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथे एमजीएम ट्रस्टमधील विनोबा भावे हॉलमध्ये संघटनेच्या साप्ताहिक विंगचे भव्यदिव्य असे राज्यव्यापी एकदिवशीय अधिवेशन होवू घातले असून आपल्या सर्वांना हे अधिवेशन यशस्वी करुन दाखवायचे आहे.
अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीपदादा शेळके हे असणार आहेत. या अधिवेशनात पत्रकारांना विमा कवचासह साप्ताहिक पत्रकारांच्या हितासाठी विविध महत्वपुर्ण ठराव पारित करण्यात येतील.
तरी वाशिम जिल्हयातील साप्ताहिक विंगच्या पदाधिकारी व सदस्यांसह इतर सर्व साप्ताहिकांच्या संपादक, प्रतिनिधी व पत्रकारांना कळकळीची विनंती की,आपण सर्व या महत्वपुर्ण अधिवेशनाला जातीने उपस्थित राहून अधिवेशन यशस्वी करावे अशी आग्रहाची विनंती व आवाहन
व्हाईस ऑफ मिडीया वाशिमचे जिल्हाध्यक्ष संदीप ओं. पिंपळकर पिंपळकर व सर्व पदाधिकाऱ्यांनी केली आहे.