वाशीम : एकेकाळी संत गजानन महाराजांचे परमशिष्य 'संत पितांबर महाराज गुरु संत गजानन महाराज',यांची पावले पडून, 'सुकलेल्या आंब्याला नविन पालवी फुटणाऱ्या' पवित्र पावन अशा 'ग्राम कोंडोली' ह्या वाशीम जिल्ह्यातील,मानोरा तालुक्याच्या कोंडोलीची इतिहासात नोंद आहे.या गावचे भूमिपत्र असणारे,जिल्ह्याच्या विकासासाठी कार्यरत असणारे आणि रात्री बेरात्री जात पात धर्म न पाहता,दिनदुबळ्या गोरगरीबाच्या हाकेला ओ देणारे सुस्वभावी, हजरजवाबी, कार्यतत्पर नेतृत्व म्हणून उदयास आलेले अमोलभाऊ पाटणकर यांची राज्याचे मुख्यमंत्री मननिय देवेन्द्रजी फडणवीस यांनी दि.२९ ऑगष्ट २०२५ रोजी त्यांचे म्हणजेच मुख्यमंत्र्याचे उपसचिव म्हणून नियुक्त केली. त्यांच्या नियुक्तीचे वृत्त श्रीगणेश उत्सवाचे मंगल पर्वावर जिल्ह्यात येवून धडकताच सर्वत्र आनंदी आनंद व्यक्त करण्यात येत आहे. अमोलभाऊ पाटणकर यांची 'साधी राहणी उच्च विचार' सर्वांनाच भावून जातात. त्यांच्या कार्यतत्परतेने जिल्ह्यातील विकासाची पण वर्षानुवर्षे प्रलंबीत असलेली अनेक कामे मार्गी लागलेली आहेत.शिवाय त्यांच्याच नेतृत्वात जिल्ह्यातील कारंजा मानोरा आणि वाशिम मंगरूळपिर विधानसभा मतदार संघात भाजपाला विजय मिळालेला असल्याचे निर्विवाद सत्यही आहे. त्यामुळे मागीलवर्षी २०२४ मधे आधी त्यांची मुख्यमंत्र्याचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाली होती. त्या काळात त्यांनी केवळ जिल्ह्यासाठी नव्हे तर राज्याच्या विकासासाठी आणि जागतिक डिजीटल कॉन्फरन्स मध्ये जागतिक पातळीवर केलेले राज्याचे नेतृत्व करून आपल्या कामगीरीची चुणूक जगाला दाखवून दिली. त्यांच्या अशा विविध विकासात्मक कार्याची दखल घेऊन मुखमंत्री मा. देवेन्द्र फडणवीस यांचे उपसचिव म्हणून त्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. त्याबद्दल विदर्भ लोककलावंत संघटने कडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विदर्भ उपाध्यक्ष संजय कडोळे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे वाशिम जिल्हाध्यक्ष किरण क्षार,सुनिल दहापूते,विदर्भ लोककलावंत संघटनेचे पदाधिकारी प्रदिप वानखडे, लोमेश पाटील चौधरी, नंदकिशोर कव्हळकर,पांडूरंग माने, मोहित जोहरापूरकर कारंजा,कोंडोली येथील सुदामजी तायडे, सागर कोटलवार,गजानन घुबडे, कारंजाचे विजय खंडार, उमेश अनासाने, शेषराव इंगोले, रोहित महाजन,मंगरुळपिरचे लक्ष्मणराव इंगळे, कारंजाचे सुरेश हांडे, कैलास हांडे, आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.