कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे ): हवामान शास्त्रज्ञ आणि वेधशाळेच्या अंदाजाना बगल देत यंदा मान्सूनचा पाऊस हुलकावणीच देत असल्याने, हजारो हेक्टर जमिनी वरील पेरण्या लांबल्या आहेत.त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. आकाशात ढगे दाटून येतात. वातावरणही अंधारून येते.परंतु अद्यापपर्यंत पेरणी करीता समाधानकारक पाऊसच झाला नाही.बघता बघता जून महिना संपत आला.मृग नक्षत्र तर संपलीच त्यानंतरचे आद्रा नक्षत्राचा ही उत्तरार्ध सुरु होत आहे.परंतु पाऊस मात्र हुलकावणीच देत असल्याने शेतकऱ्यांना काय करावे ? तेच कळत नाही.निवडक शेतकऱ्यांनी,कपाशी आदी पिकांचा पेरा वाढविण्याचा निर्णय घेऊन यावर्षी कपाशी क्षेत्र वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे यंदा कपाशीचे क्षेत्र जास्त दिसणार आहे.तर काही शेतकर्यांनी सोयाबिन,तुर वाणाची पेरणी तर केली.पण आता त्यांना पावसाची प्रतिक्षा करावी लागत असल्याचे दिसून येत असून,देशातील हवामान तज्ञ आणि वेधशाळेच्या अंदाजावरचा त्यांचा विश्वास उडाला आहे.