अकोला :
मानवी जीवनात वाचनाला महत्वाचे स्थान आहे. वाचणामुळे माणूस विचारी बनतो. त्याचे मन सुसंस्कृत होते, माणसाला ज्ञान प्राप्तीसाठी वाचन महत्वाचे आहे, त्याला माहिती ही विविध ग्रंथातून व लेखातून मिळत असते, माणसाला ज्या प्रमाणे भूक भागविण्याकरिता अन्नाची गरज असते, त्याचं प्रमाणे बौद्धिक भूक भागविण्याकरिता विविध ग्रंथांची गरज असते, वाचणामुळे माणसाला जीवनात येणाऱ्या संकटावर मात करण्याकरिता धैर्य प्राप्त होते.
माणसाचा जीवनात वाचनाला महत्व असूनही पाहिजे तेवढी वाचनाविषयीं आवड निर्माण झालेली नाही . कारण आज इंटरनेट, व्हाट्सअप, गुगल, फेसबुक, ई. चे प्रमाण वाढल्यामुळे वाचनाकडे वाचकांचा कल कमी झालेला आहे. तसेच इतरही काही कारणांमुळे जसे निरक्षरता कौटुंबिक वातावरण संगत गुण गरीबी या कारणामुळे आज वाचन संस्कृती मध्ये वाढ झालेली नाही.
घरात पालकांना जर वाचनाची आवड असेल तर ती सवय घरातील मुलांना लागते. व वाचन संस्कृती टिकून राहते ते मोठे पनी चांगले वाचक बनतात कुटुंबातील मोठ्यांचा वाचनाच्या सवयीचा परिणाम मुलांवर होतो. परंतु आजही बहुतांश घरामध्ये मुलांना वाचनाची आवड आई वडिलांकडून लावली जात नाही. त्यामुळे त्यांचा वाचनाकडे कल् कमी राहतो . आजच्या प्रगतीचा काळात ज्ञानचा आस्वाद घेता येण्या करिता ,समाजातील लोकांमध्ये बालकांमध्ये महिलांमध्ये वाचनाची सवय लावणे आवश्यक आहे. परंतु आज आपल्या समाजामध्ये प्रत्येक माणूस भौगोलिक सुखाच्या मागे लागला आहे . त्यामुळे त्याचे वाचणाकडे दुर्लक्ष झाले . त्यामुळे जिल्ह्यात राज्यात देशामध्ये रोज विविध क्षेत्रात काय घडत आहे, त्याची माहिती त्यांना होत नाही.
काही लोकांचे वाचन फक्त वर्तमान पत्रापुरतेच असते. घरामध्ये मोठ मोठे शोभेचे वस्तू मोठ्या किमतीने विकत घेतात. परंतु वाचनाकरिता एखादे पुस्तक, ग्रंथ विकत घेत नाहीत कारण त्यांना ग्रंथाविषयीं आवड नसते. जीवनामध्ये ज्या वस्तूला आपण मोठे किंवा वेगले स्थान देतो तसेच स्थान ग्रंथांना जीवनात दिले पाहिजे ते आपण देत् नाही. त्यामुळे ग्रंथाविषयीं त्यांचा मनामध्ये महत्वाचे स्थान नसते.
सार्वजनिक ग्रंथालयामुळे वाचक हा ग्रंथप्रेमी बनतो . लहानापासून ते मोठ्यापर्यंत ग्रंथांबद्दल प्रेम आणी वाचनाची आवड निर्माण हे सार्वजनिक ग्रंथालये करतात, मानवाला इतिहास कालीन वारसा हा ग्रंथामुळं मिळतो. ग्रंथ हे वाचकांना सुखाचा आनंद मिळवून देतात. वाचनाच्या माध्यमातून वाचकांची बौद्धिक जडणं घडणं करण्याचे सामर्थ्य सार्वजनिक ग्रंथालयामध्ये आहे. वाचन ही.सुजाण व्यक्तींची गरज असते ही गरज भागविण्याची जबाबदारी सार्वजनिक ग्रंथालये पार पाडीत असतात. म्हणजेच ते वाचन संस्कृती चा वारसा टिकून ठेवण्याचे कार्य करीत असतात आज ही आपल्या देशात निरक्षर नागरिक मोठ्या प्रमाणात आहे ही देशापुढील मोठी समस्या आहे . ती दूर करण्याकरिता सर्वजनिक ग्रंथालये मोलाची कार्य करीत असतात. नीरक्षितांना वाचते करून त्यांना अज्ञानाच्या अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी ज्ञानाची पानपोयी हे सार्वजनिक ग्रंथालय करीत असतात.
राज्यातील बहुसंख्या लोक हे ग्रामीण भागात राहत असले तरी आज ही अनेक ग्रामीण भागामध्ये सार्वजनिक ग्रंथालये सुरु झालेली नाहीत. वास्तविक पाहता ग्रामीण भागातील जनतेला वाचनीय साहित्य उपलब्ध करून देणे. हे अधिक गरजेचे आहे . ज्यामुळे त्यांचा मध्ये वाचनाची आवड निर्माण होईल.राज्यातील ग्रामीण भागातील लोकांना. ज्ञानाची दारे उघडी करून देण्याचा कामात सार्वजनिक ग्रंथालय मोलाचे कार्य करित् आहे. ग्रंथ सहज पणे लोकांचा हाती विनाशुल्क पडले की त्यांचा मध्ये वाचनाची आवड निर्माण होईल . आजही देशामध्ये सार्वजनिक ग्रंथालये मोलाची सेवा देऊन माणसाला सुसंस्कृत बनविण्याचे कार्य करीत आहेत . त्यांना टिकवून ठेवण्याची जबाबदारी ही आपणा सर्वांची आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....