पोलीस स्टेशन ब्रम्हपूरी येथे दाखल दि. 07/07/22 रोजी कलम 302, 364, 201, 34 भादवी सह. 3(2)(v)अ.जा.अ.प्र.का. अन्वये दाखल खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीस पोलीसांनी शिताफिने अटक केली.
माहे ऑगस्ट 2021 पोलीस स्टेशन ब्रम्हपूरी येथे दाखल मीसींग मुलगी नामे कु. ऐश्वर्या दिगंबर खोब्रागडे हीचा मृतदेह हरदोली शिवारातील वैनगंगा नदीकिनारी असलेल्या पंप हाऊस येथे आढळल्याने पो.स्टे.ला कलम 302, 364, 201, 34 भादवी सह 3 ( 2 ) (v) अ.जा.अ.प्र.का. अन्वये खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. तपासादरम्यान आरोपी तुषार उर्फ तरुण राजु बुज्जेवार रा. वडसा यास अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी संदीप उर्फ दुर्गेश रेखलाल पटले रा. वडसा हा फरार होता. त्याचे शोधकामी पोलीस तपास पथक तयार करण्यात आले. गुप्त माहीतीच्या आधारे व सायबर सेल चंद्रपूरच्या मदतीने त्याचा शोध घेउन त्यास वडसा हद्दीतील वैनगंगा नदीच्या पुलाजवळून ताब्यात घेण्यात आले. त्यास गुन्ह्याविषयी विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. सदर आरोपीवर पो.स्टे वडसा येथे 2018 मध्ये खुनाचा गुन्हा व पोस्टे गोंदिया शहर येथे चोरीचा गुन्हा नोंद आहे. आरोपीस अटक करण्यात आली असून सध्या पोलीस कस्टडीत आहे.
श्री. अरविंद साळवे सा पोलीस अधिक्षक, जि. चंद्रपूर श्री. मल्लिकार्जून इंगळे सा उपविभागीय पोलीस अधिकारी, मुल, अतिरीक्त कार्यभार ब्रम्हपूरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन ब्रम्हपूरीचे ठाणेदार रोशन यादव, सपोनी प्रशांत ठवरे, पोउपनी सुरेंद्र उपरे पोहवा / अंकूश आत्राम, नापो / सचिन बारसागडे, मुकेश गजबे, योगेश शिवनकर, पोशी / विजय मैद, संदेश देवगडे, अजय कटाईत व पोलीस स्टेशन ब्रम्हपुरीमधील स्टॉफ यांनी ही कामगीरी केली. सदर गुन्ह्याचा तपास श्री. मल्लिकार्जुन इंगळे सा. उपविभागीय पोलीस अधिकारी मुल, अति कार्य ब्रम्हपूरी हे करीत आहेत.