कारंजा नगरपालिकेचे बऱ्याच महीण्यापासून रिक्त असलेल्या मुख्याधिकारी पदी महेश वाघमोडे यांची दि.२४ जून २०२५ रोजी नियुक्ती झाली असून लवकरच रुजू होणार आहेत.मुख्याधिकारी महेश वाघमोडे हे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथे सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत होते.तेथून त्यांची बदली कारंजा येथे करण्यात आली आहे.उपायुक्त पदावर काम करणारा अधिकारी कारंजा नगरपालिकेला मुख्याधिकारी म्हणून मिळाल्यामुळे विकास कामाला वेग येईल व सर्वसामान्य न्याय मिळेल अशी चर्चा कारंजा नगरवासीयामध्ये सुरु आहे.