अकोला-- लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेच्या नांदेड शहर अध्यक्षपदावर संवेदनशील समाजसेवक व मिडीया प्रतिनिधी श्री नुरूद्दीन जावीद सिध्दीकी यांची निवड करण्यात आली आहे.लोकस्वातंत्र्यचे मराठवाडा अध्यक्ष अॕड.एन.जी.सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली नांदेड जिहाध्यक्ष ईश्वर तलवारे यांनी ही नियुक्ती केली आहे.
पत्रकार महासंघाच्या अकोला येथील ३७ व्या मासिक विचारमंथन तथा स्नेहमिलन मेळाव्यात संघटनेचे संस्थापक - राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांनी त्यांचे संघटना विस्तारात मुंबई आणि हैद्राबाद येथील सभासद वाढीच्या कार्यातील आणि सिनेसृष्टी व हिन्दी साहित्य क्षेत्रातील योगदानाबध्दल त्यांना याप्रसंगी सन्मानित केले.सिध्दीकी या कार्यक्रमासाठी नांदेड येथून आलेले होते. विचारमंथन, मार्गदर्शन, "विलक्षण विभूती आणि जगावेगळी माणसं" या पुस्तकाचे प्रकाशन, २० पदाधिकारी व सभासदांचे ओळखपत्र वितरण आणि सन्मान समारंभ, असा हा कार्यक्रम होता.यावेळी त्यांना जिल्हाध्यक्ष ईश्वर तलवारे यांच्या सहीचे नांदेड शहर अध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. त्याचप्रमाणे विश्वप्रभात वृत्तपत्र व न्यूज पोर्टलचे सिनेसृष्ट्रीचे मुंबई व नांदेड प्रतिनिधी म्हणून त्यांच्या नियुक्तीची घोषणा यावेळी करण्यात आली.
अध्यक्ष संजय देशमुख यांचे हस्ते लोकस्वातंत्र्य व विश्वप्रभात ओळखपत्र आणि नांदेड शहर अध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी सर्व केन्द्रीय,विभागीय,जिल्हा पदाधिकारी,संघटना व विचारमंथनाच्या असंख्य सभासदांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संचलन संघटनेच्या केन्द्रीय पदाधिकारी सौ.जया भारती तर आभारप्रदर्शन राष्ट्रीय सचिव राजेन्द्र देशमुख यांनी केले.