अकोला:-स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या माध्यमाने संस्थापक अध्यक्ष डॉ.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात दिव्यांगांच्या रोजगारासाठी विविध सामाजिक उपक्रम संपूर्ण भारतभर निरंतर राबवले जात आहेत . दि. 23 व 24 ऑगस्ट २०२५ रोजी इंद्रप्रस्थ भवन, दुर्गा चौक,अकोला येथे फेम अँड फेम एक्सपो चे कला प्रदर्शन आयोजित केले आहे .सदर कला प्रदर्शनी मध्ये दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे सहभाग नोंदवला जाणार आहे . गौरी-गणपती व नवरात्री उत्सवासाठी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे विविध कलात्मक वस्तू व पूजा साहित्याची निर्मिती केली जात असून या कला प्रदर्शनी मध्ये संस्थेचा विशेष स्टॉल आकर्षण म्हणून उपलब्ध असणार आहे. या कला प्रदर्शनीचे उद्घाटन 23 ऑगस्ट २०२५ रोजी खासदार अनुप भाऊ धोत्रे, आमदार वसंतजी खंडेलवाल,आमदार रणधीर सावरकर, दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे संस्थापक अध्यक्ष
डॉ.विशाल कोरडे आयोजन समितीच्या नीलू बंसल व दीपा शुक्ला यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे .कला प्रदर्शनीच्या दोन्ही दिवशी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या दिव्यांग व्यक्तींची उपस्थिती लाभणार असून श्री शिवाजी महाविद्यालयाचे डॉ.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत. इंद्रप्रस्थ भवन येथे होणाऱ्या प्रदर्शनीला अकोलेकरांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आव्हान आयोजन समितीचे नीलू बंसल, दीपा शुक्ला व दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे केले आहे.