विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास व्हावा व त्यांची सर्वांगीण प्रगती व्हावी या दृष्टीने विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ उपलब्ध होण्यासाठी सांस्कृतिक स्पर्धा घेणे गरजेचे आहे.तसेच मानवी जीवनात मानव पैशाच्या मागे तर विद्यार्थी जीवनात विद्यार्थी गुणाच्या मागे धावताना त्यांचे सुप्त कलागुण लपून राहतात पण आशा प्रकारच्या स्पर्धा मुळे त्यांच्या सुप्त कलागुण लोकांसमोर येतात व त्यांच्यातील कलाकार दिसून पडतात.असे प्रतिपादन वांद्रा गाव येथिल उपसरपंच गुरुदेव वाघरे यांनी अष्ट विनायक गणेश मंडळ वांद्रा तर्फे आयोजित गोपाल काल्या निमित्त सांस्कृतिक स्पर्धा दी.23/09 /2022ला घेण्यात आली. त्यामध्ये उद्घाटन प्रसंगी बोलतांना म्हटले.
यावेळी उद्घाटक ॲड. संजयराव ठाकरे गडचिरोली,सह उद्घाटक उपसरपंच गुरुदेव वाघरे, वांद्रा ग्रामपंचायत चे सरपंच महादेव मडावी,सेवा सोसायटी अध्यक्ष तसेच कार्यक्रमाचे रामदास कोरटे ,उपाध्यक्ष माजी सरपंच नरेश मेश्राम, प्रमुख अतिथी म्हणून प्रभाकर भागडकर, वनसमिती अध्यक्ष चंद्रशेखर मेश्राम, लो मेश मेश्राम,रघुनाथ गडे, नेतराज गडे,सुधीर कोरटे, दयाराम राऊत, यशवंत राऊत,ग्राम पंचायत सदस्य लोमे श मेश्राम, वनिता मेश्राम , तारा कांबळी, कविता पाल, सविता ठाकरे, माजी सरपंच रामचंद्र ठाकरे, भाऊराव मेश्राम, तिमाजी निकुरे, लालाजी राऊत,कार्यक्रमाचे संचालन रोशन नवघडे तर आभाप्रदर्शन नितिन किनेकार यांनी केले.