मराठीचे प्रथितयश कवी व पुस्तक वाचनाचा सतत छंद असलेले प्रमिलाताई ओक ग्रंथालयाच्या ग्रंथपाल सौ अलका जोशी यांचे पती श्री मुकुंद गणेश जोशी यांचे नुकतेच वयाच्या 82व्या वर्षी वृद्धापकाळाने अल्पशा आजाराने निधन झाले त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला असतानाही कुटुंबातील सर्व सदस्यांनी त्यांच्या नेत्रदानाचा संकल्प पूर्ण करण्याकरिता नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला याकरिता जीएमसी येथील नेत्र विभाग प्रमुख नेत्रदान समुपदेशक नंदन चौर पगार डॉ स्नेहल हिवराळे आणि डॉक्टर उज्मा झरीन यांनी त्यांचे नेत्र गोलक काढून दोन गरजू व्यक्तींना डोळ्याचे रोपण करून त्यांना नवी दृष्टी प्राप्त करून दिली
नेत्र दाना प्रसंगी त्यांच्या पत्नी अलका जोशी सुपुत्रि सौ मीनल टेंभे दीपक पेठे अनघा पेठे वर्षां दासानी दीपक दासानी संजय पेठे मेघना पेठे कमल टांक प्रमिलाताई ओक स्मारक समितीचे अध्यक्ष मनमोहन तापडिया अकोला जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा डॉ.सत्यनारायण बाहेती आणि परिवारातील सर्व सदस्य हजर होते
याबद्दल जोशी परिवारातील सदस्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.