वाशिम : आपल्या देशात दिवंगत प्रधानमंत्री यांनी "जय जवान - जय किसान" असा नारा दिला होता. त्यामागचा उद्देश म्हणजे ज्याप्रमाणे स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता देशाचा जवान म्हणजे सैनिक देशाच्या सिमेवरअहोरात्र पहारा देवून शत्रूंशी सामना करीत असतो म्हणून त्याची गणणा देशभक्तामध्ये होत असते. त्याच प्रमाणे जगाचा पोशिंदा असलेला आमचा शेतकरी देखील स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता देशावर उपासमारीची वेळ येऊ नये. देशातील जनतेच्या उदरभरणाकरीता, ऊन थंडी पावसाची,रात्री बेरात्री जागलीची पर्वा न करता धान्य पिकवीत असतो. आणि म्हणूनच देशाच्या जवाना एवढाच महत्वाचा देशाचा किसानही आहे. अलिकडे काही वर्षात केव्हा कोरडा दुष्काळ तर केव्हा ओला दुष्काळ.केव्हा निसर्गाचा कोप तर केव्हा पिकाला हमीभाव मिळत नसल्याने सरकार कडून चोप.अशा चक्रव्युव्हात,पिकासाठी मातीमध्ये बियाणे पेरणीसाठी सोने गमविणाऱ्या,प्रसंगी सरकारी बँका कर्ज देत नसल्यामुळे शेती पिकविण्यासाठी सावकारी पाशात अडकणाऱ्या शेतकऱ्यावर, पाहिजे तेवढे अपेक्षीत पिकं न झाल्याने,हंगामाने निराश केल्याने किंवा सावकारी कर्जात बुडालेल्या शेतकऱ्यावर नैराश्यातून आत्महत्येसारखी वेळ येऊन पोहेचते किंवा त्याला नैराश्यातून हृदयविकारासारखा गंभीर धक्का बसतो. त्यामुळे याचा तर बिचाऱ्याचा जीव जातो. मात्र त्याच्या जीवावर जगणाऱ्या त्याच्या बायकापोरांचा,लहान भावा बहिणीचा,म्हाताऱ्या आईवडिलांचा तर कायमचा आधार तुटतो.त्यांच्या कुटुंबातील राब राब राबणारी कमवती व्यक्तीच कायमची निघून गेलेली असते.यामध्ये त्याच्या मागे निराधार झालेल्या त्याच्या आई वडिल पत्नीचा काय दोष असतो ? त्याच्या जाण्याने अनाथ झालेल्या चिमण्या पाखरांचा काय गुन्हा असतो ? अशा निराधार अनाथ झालेल्या शेतकरी कुटुंबाला जगण्यासाठी बळ देणे राज्य शासनाचे कर्तव्य नाही काय ? परंतु दुदैवाने, महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभाग परिपत्रक क्र. : एससीवाय -2024 / प्र.क्र.49 म-7 दिनांक 03 सप्टेंबर 2024 प्रमाणे शेतकरी आत्महत्याप्रकरणी 2024 -25 वर्षात, शेतकरी मृत्युनंतर,शेतकरी कुटुंबाची आर्थीक मदत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.परंतु शासनाचा हा निर्णय म्हणजे शेतकरी राजाचा घोर अपमान असून,निष्पाप शेतकरी कुटुंबाला वाऱ्यावर सोडण्याचा असल्याची प्रतिक्रिया शेतकरी मित्र दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी दिली असून,महायुती सरकारने हा शेतकरी कुटुंबावर अन्यायकारक असलेला,चुकीचा निर्णय जर मागे घेतला नाही तर लवकरच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्रातील शेतकरी,शेतकरी कुटूंब या सरकारला पायऊतार ब करून हद्दपार केल्या शिवाय स्वस्थं बसणार नाहीत.तरी शासनाने या निर्णयावर विचार करून जगाच्या पोशींद्याप्रती कृतज्ञतेची भावना ठेवली पाहिजे.